आयुषमान खुराणाने कवितेद्वारे व्यक्त केल्या भावना, कविता वाचून तुम्ही देखील व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:01 PM2020-03-31T18:01:03+5:302020-03-31T18:01:58+5:30

या कवितेद्वारे आयुषमानने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ayushmann Khurrana Recites A Heartfelt Poem Amid Coronavirus Lockdown PSC | आयुषमान खुराणाने कवितेद्वारे व्यक्त केल्या भावना, कविता वाचून तुम्ही देखील व्हाल भावूक

आयुषमान खुराणाने कवितेद्वारे व्यक्त केल्या भावना, कविता वाचून तुम्ही देखील व्हाल भावूक

googlenewsNext
ठळक मुद्देआयुषानने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो म्हणत आहे की, मी कधीच माझ्या घराबाहेरचे रस्ते इतके शांत पाहिलेले नाहीत. मला असं वाटतंय किती वर्षांपासून मी माझी कार बाहेर काढलेली नाहीये... श्रीमंत लोक तर हे सगळं काही सहन करू शकतात... पण गरिबांचे काय?

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून गरिबांची अवस्था तरी अतिशय भीषण आहे. अनेक मजूर आपापल्या घरी परतण्यसाठी कित्येक किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. आपल्या घरी परतण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या मजुरांच्या परिस्थितीवर आयुषमान खुराणाने एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.

आयुषमानची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून ही पाहून नेटिझन्स भावुक होत आहेत. आयुषानने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो म्हणत आहे की, मी कधीच माझ्या घराबाहेरचे रस्ते इतके शांत पाहिलेले नाहीत. मला असं वाटतंय किती वर्षांपासून मी माझी कार बाहेर काढलेली नाहीये... श्रीमंत लोक तर हे सगळं काही सहन करू शकतात... पण गरिबांचे काय? ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी इतरांना मदत करणे गरजेचे आहे... मी आशा करतो की, चांगला काळ लवकरच येईल... पण या काळात आपण लोकांना मदत केली पाहिजे, निसर्गाची माफी मागितली पाहिजे आणि देवाचे आभार मानले पाहिजेत...

यासोबत त्याने एक कविता लिहिली आहे. या कवितेद्वारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  
ग़लतियाँ सारी बक्श दे,
ग़र बक्श सके.
दौलत शोहरत भी उतनी दे, जो पच सके.
ले ले वापस हैसियत से ज़्यादा दिया हो ग़र तूने.
बस ध्यान रहे कभी किरदार पे दाग ना लगे।। -आयुष्मान

आयुषमानची ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत असून त्याच्यावर अनेकजण भरभरून कमेंट करत आहेत. त्याचा हा व्हिडिओ केवळ काही तासांत सहा लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Web Title: Ayushmann Khurrana Recites A Heartfelt Poem Amid Coronavirus Lockdown PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.