बॅक टू बॅक २ सिनेमा फ्लॉप होताच Ayushmann Khurranaने मानधनाबाबत घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:00 PM2022-09-29T13:00:49+5:302022-09-29T13:13:10+5:30
'अनेक' आणि 'चंडीगढ करे आशिकी' सारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आयुष्मान खुराणाने त्याच्या मानधनाबाबत मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय.
कोविडचा परिणाम बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर झाला आहे. हे कोणापासूनही लपलेले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर संघर्ष केला आहे. या चित्रपटांना पूर्वीसारखे यश मिळू शकले नाही. दरम्यान, आयुष्मान खुरानाने त्याच्या फीमध्ये कपात केल्याची बातमी आहे.
आयुष्मानने कमी केलं त्याचं मानधन
'अनेक' आणि 'चंडीगढ करे आशिकी' सारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आयुष्मानने त्याच्या फीमध्ये 10 कोटींची कपात केली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आयुष्मान खुराना साइनिंग फी म्हणून 25 कोटी रुपये घेतो. मात्र त्यानं आता 15 कोटींवर आणली आहे. उर्वरित 10 कोटी रुपये तो चित्रपटाच्या प्रॉफिटनुसार घेणार. त्याचा चित्रपट हिट ठरला तर तो पूर्वीपेक्षा जास्त कमाई करू शकेल. याचा फायदा त्याला आणि निर्मात्यालाही होईल.
प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर आयुष्मान खुराना लवकरच 'डॉक्टर जी' मध्ये दिसणार आहे.आयुषमान खुराना नेहमी एकापेक्षा एक हटके भूमिका रुपेरी पडद्यावर साकारताना दिसतो. पुन्हा एकदा तो हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी तो डॉक्टर जी चित्रपटात स्त्रीरोग तज्ज्ञ उद्य गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुराग कश्यपची बहीण अनुभूती हिचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे.
'डॉक्टर जी' व्यतिरिक्त आयुष्मान खुराना 'अॅन अॅक्शन हिरो' आणि 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटांमध्येही काम करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' मधील पूजासोबत तो परतणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.