अशी आहे आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यपची लव्ह स्टोरी, असे केले होते आयुषमानने ताहिराला प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 17:33 IST2020-03-16T17:30:02+5:302020-03-16T17:33:19+5:30
आयुषमानने ताहिराला कशाप्रकारे प्रपोज केले हे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

अशी आहे आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यपची लव्ह स्टोरी, असे केले होते आयुषमानने ताहिराला प्रपोज
आयुषमानचे पत्नी ताहिरा कश्यपवर खूप प्रेम आहे ही गोष्ट जगजाहीर आहे. आयुषमान तिच्यावरचे प्रेम वेळोवेळी व्यक्त करत असतो. आयुषमानने त्याच्या पत्नीच्या फोटोचा एक कोलाज इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यासोबत त्याने ताहिराला कशाप्रकारे प्रपोज केले हे सांगितले आहे.
आयुषमानने इन्स्टाग्रामच्या पोस्टवर लिहिले आहे की, ते 2001 चे वर्षं होते... आम्ही आमच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होतो. मी रात्री ताहिरासोबत फोनवर बोलत होतो. रात्री 1 वाजून 48 मिनिटांनी फोनवर बोलत असताना माझ्या मनातील भावना मी ताहिराला सांगितल्या होत्या. त्यावेळी ब्रायन एडम्सचे गाणे माझ्या डोक्यात घुमत होते. त्या गोष्टीला 19 वर्षं झाली.
आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप हे बालमित्र होते. १२ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी २००८ साली लग्न केले. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. वीराजवीरचा जन्म 2012 मधील तर वरुष्काचा जन्म 2014 मधील आहे. आयुषमान त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो.
ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे काही महिन्यांपूर्वी निदान झाले होते. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकलीही. ताहिराने आपल्या आजाराबद्दल कधीच काहीही लपवले नाही. केमोथेरपीने डोक्यावरचे केस गळले. पण ते लपवण्यासाठी ताहिराने खोटे केस लावले नाहीत तर थेट मुंडण केले. अगदी मुंडण केलेल्या अवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही उतरली. यानंतर ताहिराने काय करावे तर आपल्या सर्जरीची जखम दाखवणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टचे बरेच कौतुक झाले होते.
आयुषमानचे शिक्षण पंजाबमध्येच झाले. त्यानंतर त्याने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तो 17 वर्षांचा असताना चॅनल व्हीवरील एका कार्यक्रमात तो झळकला होता. त्याने आरजे म्हणून देखील काम केले आहे. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर त्याला विकी डोनर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या पहिल्याच चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्याने आजवर शुभ मंगल सावधान, बधाई हो, बरेली की बर्फी, आर्टिकल 15 यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.