म्हणून आयुष्यमान खुरानाने मानले सर्व बॉलिवूड कलाकारांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:15 PM2020-04-07T16:15:52+5:302020-04-07T16:16:21+5:30
या व्हिडीओच्या माध्यमातून कलाकारांनी 'फिर मुस्कुराएगा इंडिया' हा महत्त्वाचा संदेश दिला आहे.
कोरोना व्हायरस विरोधातील लढाई आणखी बळकट करण्यासाठी बॉलिवूड कलाकार एकत्र येत त्यांनी एका गाण्याची निर्मिती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ ट्वीट केले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून कलाकारांनी 'फिर मुस्कुराएगा इंडिया' हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. अक्षय कुमार आणि निर्माता-निर्देशक जॅकी भगनानी यांनी एकत्र येऊन हे गाणं तयार केले आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार, आयुष्यमान खुराणा, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यासारख्या अनेक कलाकरांनी काम केले आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाने या मोहिमेचे स्वागत करत यात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे आभार मानले आहेत.
आयुष्यमान म्हणतो "एक नागरिक म्हणून सध्याची परिस्थिती बघता आपल्याला शक्य तेवढी मदत आपण आपल्या बंधू भगिनींना केली पाहिजे. जितके शक्य असेल तितकी मदत करावी. कोरोना सारख्या महामारीला आपल्या देशांतून बाहेर काढून पुन्हा एकदा स्वस्थ आणि सुरक्षित जीवन आपल्याला जगायाचे आहे. मला जेव्हा कळले की माझ्या इंडस्ट्रीमधील कलाकार एकत्र येऊन निधी जमा करत आहे मी लगेचच त्याचा एक भाग झालो.
या गाण्याच्या शब्दांनी आयुष्यमानला भावूक केले आहे, कारण हे गाणं आपल्या सध्याच्या परिस्थितीचे प्रतिबिंब आहे आणि उज्ज्वल भविष्याची आशा आहे. त्यामुळे मी या गाण्याशी त्वरित जोडलो गेलो. आपल्या सर्वांनी अशा वेळी सकारात्मक असणे आवश्यक आहे. आम्ही धौर्यवान आहोत आणि आपण यावर नक्कीच मात करू. आपल्याल एकत्र राहण्याची गरज आहे."