Anek Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? कसा आहे आयुष्यमान खुराणाचा ‘अनेक’?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:07 PM2022-05-27T17:07:05+5:302022-05-27T17:22:12+5:30
Anek Movie Twitter Review : सामाजिक संदेशासोबत अॅक्शनचा डोज असलेला ‘अनेक’ हा सिनेमा कसा आहे? पब्लिकचं काय मत आहे? ट्विटरवर लोकांनी रिव्ह्यू दिला आहे.
Anek Movie Twitter Review : अभिनेता आयुष्यमान खुराणाचा (Ayushmann Khurrana) ‘अनेक’ (Anek ) हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. ‘आर्टिकल 15’नंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबतचा आयुष्यमानचा हा दुसरा चित्रपट. दरवेळेप्रमाणेच आयुष्यमान एक नवीन विषय घेऊन आला आहे. त्याचा हा चित्रपट ईशान्य भारतातील राजकीय संघर्षावर आधारित आहे. सामाजिक संदेशासोबत अॅक्शनचा डोज असलेला हा सिनेमा कसा आहे? पब्लिकचं काय मत आहे? ट्विटरवर लोकांनी रिव्ह्यू दिला आहे. काहींना चित्रपट भलताच आवडला आहे. अगदी हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची मागणी अनेकांनी केली आहे. काहींनी मात्र हा चित्रपट ‘मास एंटरटेनर’ नसल्याचं म्हटलं आहे. वाचा, पब्लिकचा रिव्ह्यू...
भारताने हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवावा...
#AnekMissionActionBegins#Anek#Anek#BhoolBhulaiyaa2 Watched Anek
— RITAM DHARA (@RITAMDHARA102) May 27, 2022
What A movie!!!
Guys must watch
5 stars/5 Stars
India should send this movie for oscars
आयुष्यमान, अनुभव सिन्हा तुम्हाला सॅल्युट
Watching #Anek at Dubai Censor Board !
— BOXOFFICE (@boxoofice) May 27, 2022
OMG just awesome ". Selute sir
🇮🇳Full on engaging flick from start to end. @anubhavsinha is another hit movie on bollywood coming soon, Mind blowing acting sir @ayushmannk nailed it
आयुष्यमानचं उत्तम काम, पण...
Review - #Anek
— Rohit Jaiswal (@rohitjswl01) May 27, 2022
Rating - 2*/5 ⭐️⭐️
Anek tells a story which is interesting but it fails badly in terms of execution, not at all meant to be a BIG SCREEN RELEASE, #AyushmannKhurrana work is excellent but story telling, screenplay & direction is POOR & VERY SLOW…..#AnekReviewpic.twitter.com/aKST6Gh1KC
must watch this film - 4/5 - #Anek#AnekReview#anektrailer#AyushmannKhurrana#AnubhavSinha@ayushmannk@anubhavsinha@TSeries - https://t.co/T7gS0TXYH3
— Hetal (@KumariHetal) May 27, 2022
Saw #Anek and just speechless. What an amazing performance @ayushmannk 👏👏 What an amazing film @anubhavsinha 👏 This needs to be watched by every Indian. I don’t rate films but I’d rate this one as ⭐️⭐️⭐️⭐️🌟 #AnekReview
— Aarti Tiwari (@aartiteewari) May 26, 2022
अशी आहे स्टोरी
संवेदनशील मुद्यांवर चित्रपट बनवणाऱ्या अनुभव सिन्हा यांनी ‘अनेक’ या चित्रपटात वास्तव दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आयुष्यमान यात अंडर कव्हर एजंटच्या रूपात आहे. आयुष्यमानला ईशान्यकडील राज्यांत कर्तव्यावर पाठवलं जातं. येथील फुटीरवादी संघटनांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाते. भारत सरकार येथील एका मोठ्या फुटीरवादी संघटनेचा म्होरक्या टायगर सांगासोबत शांती चर्चा करू इच्छित असते आणि आयुष्यमान त्यासाठी प्रयत्न करत असतो. याचदरम्यान आयुष्यमान एका बंडखोर नेत्याच्या मुलीवर भाळतो. तिला देशासाठी गोल्ड मेडल जिंकायचं असतं. ईशान्य भारतीय नागरिक असल्यामुळे पदोपदी सहन करावा लागणारा पक्षपात, टीका सहन करणारी ती देशासाठी मेडल जिंकू शकते का? आयुष्यमान त्याच्या मिशनमध्ये यशस्वी होतो का? याची ही कथा आहे.