आयुष्मान खुरानाचा 'हा' आहे ड्रिम रोल; मुलाखतीदरम्यान केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 02:51 PM2023-09-06T14:51:15+5:302023-09-06T14:52:18+5:30

आयुष्मान खुरानाने बायोपिकमध्ये किशोर कुमार यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Ayushmann Khurrana wants to play this legendary musician in his biopic | आयुष्मान खुरानाचा 'हा' आहे ड्रिम रोल; मुलाखतीदरम्यान केला खुलासा

Ayushmann Khurrana

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या 'ड्रीम गर्ल 2'  या सिनेमामुळे चर्चेत आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  आयुष्मानच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. आता आयुष्मान खुरानाने बायोपिकमध्ये किशोर कुमार यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आपल्या ड्रीम रोलचा उल्लेख करत आयुष्मान म्हणाला, "मला संगीतकार किंवा क्रिकेटरवर बायोपिक करायला आवडेल. मी माझ्या शाळेत क्रिकेट खेळायचो हे खूप कमी लोकांना माहित आहे". कोणत्या संगीतकारावरील बायोपिकमध्ये काम करायला आवडेल हा प्रश्न त्याला एका मुलाखतीमध्ये करण्यात आला. यावर तो म्हणाला, “मला किशोर कुमार यांच्यावर बायोपिक करायला आवडेल. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे". 

शिवाय, सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेसाठी आयुष्मानच्या नावाचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. आयुष्मान खुरानाने चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून  स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केलयं. यापुर्वी त्याने हवाईजादे या बायोपिक चित्रपटात दिसला आहे. 

सनी देओलच्या गदर-२ आणि शाहरुख खानच्या आगामी जवान चित्रपटाची क्रेझ असतानाही आयुष्मान खुरानाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. या चित्रपटात परेश रावल, मनजोत सिंग, सीमा पाहवा, अन्नू कपूर, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, असरानी, ​​विजय राज आणि मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Ayushmann Khurrana wants to play this legendary musician in his biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.