आयुष्यमान खुराणाचा अंधाधुन चित्रपट प्रदर्शित होणार या देशात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:43 PM2019-03-11T18:43:58+5:302019-03-11T18:50:59+5:30
अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील चांगलीच पसंती नोंदवली होती. तसेच या चित्रपटाची गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.
श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन हा चित्रपट ५ आॅक्टोबर २०१८ रिलीज झाला होता. आयुषमान खुराणा, राधिका आपटे, तब्बू, अनिल धवन यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाची कथा, चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटात आयुषमान खुराणाने यात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आयुषमान, राधिका आणि तब्बू या तिघांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील चांगलीच पसंती नोंदवली होती. तसेच या चित्रपटाची गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.
अंधाधुन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. भारतीयांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते आणि आता हा चित्रपट एका दुसऱ्या देशात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. अंधाधुन चीनमधील लोकांचे मनोरंजन करणार असून हा चित्रपट आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण चीनमध्ये या चित्रपटाचे नाव अंधाधुन नसून पियानो प्लेअर असे असणार आहे. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन सांगतात, अंधाधुन हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे त्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. मी दहा वर्षांपूर्वी चीनला गेलो होतो, तेव्हा तेथील बीजिंग कॅफेमध्ये नासिर हुसैन यांचा कारवाँ हा चित्रपट मी पाहिला होता. या चित्रपटातील गाणी वगळता सगळाच चित्रपट चीन भाषेत डब करण्यात आला होता. हा चित्रपट तेथील लोकांना खूपच आवडला असल्याचे त्यावेळी तेथील लोकांनी मला सांगितले होते. आता आमच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कशाप्रकारे मिळतोय हे काहीच दिवसांत कळेल.
अंधाधुन या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि मॅचबॉक्स पिक्चर्स यांनी मिळून केली होती. या चित्रपटाला चीनमधील देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.