वडिलांच्या 'त्या' फोनमुळे पालटलं होतं आयुष्मान खुरानाचं नशीब, असा सुरु झाला बॉलिवूडच्या दिशेने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:02 PM2023-05-19T17:02:40+5:302023-05-19T17:13:22+5:30
आयुष्मान खुराना याच्या वडिलांचं निधन झालं. अभिनेता त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होता.
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याच्या वडिलांचं निधन झालंय. गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांच्यावर पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांच्या प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालावली. आयुष्यामन वडिलांच्या खूप जवळ होता. त्यांच्या एका फोनमुळे आज तो अभिनेता झाल्याचे आयुष्मानने अनेकवेळा सांगितलं आहे.
आजपर्यंत आयुष्यमानने केलेल सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. आजच्या घडीला आयुष्मान खुराना इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.
आयुष्यमानने एका मुलाखती दरम्यान वडिलांबाबतचा किस्सा शेअर केले होता. आयुष्यमान म्हणाला, मी दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यावर रेडिओ जॉकीचे काम करत होता. तेव्हा एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला जायला सांगितले. हे ऐकून माझं सहकारी हैराण झाले की इकडे सगळं काही ठिक चालू असताना अचनाक मुंबईला का जायचंय. मात्र मी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत निघून आलो आणि त्यादिवसानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आहेच.