​बी-टाऊनमधील ‘रिअल लाईफ’ प्रेमत्रिकोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 07:46 AM2017-05-30T07:46:31+5:302017-05-30T13:16:31+5:30

बी-टाऊन म्हणजे सगळे काही. हॉट गॉसिप्स, कॉन्ट्रोव्हर्सी, स्कँडल, फेअरीटेल वेडिंग, ब्रेकअप्स...असे सगळे काही. बॉलिवूड इंडस्ट्रीतील रिअल लाईफ लव्हस्टोरी म्हणजे ...

B-town's real life love affair? | ​बी-टाऊनमधील ‘रिअल लाईफ’ प्रेमत्रिकोण?

​बी-टाऊनमधील ‘रिअल लाईफ’ प्रेमत्रिकोण?

googlenewsNext
ong>बी-टाऊन म्हणजे सगळे काही. हॉट गॉसिप्स, कॉन्ट्रोव्हर्सी, स्कँडल, फेअरीटेल वेडिंग, ब्रेकअप्स...असे सगळे काही. बॉलिवूड इंडस्ट्रीतील रिअल लाईफ लव्हस्टोरी म्हणजे आणखी एक मनोरंजनाचा भाग. बॉलिवूडमधील अनेकांच्या प्रेम कहाणीचा शेवट गोड झालाय. पण अनेकांची प्रेमकथा मात्र अधुरी राहिलीय. आज आपण बॉलिवूडमधील अशाच काही रिअल लाईफ लव्ह ट्रँगल अर्थात प्रेमत्रिकोणाबद्दल बोलणार आहोत....

रेखा-अमिताभ बच्चन- जया भादुरी



अमिताभ बच्चन आणि रेखा या दोघांची प्रेमकथा बॉलिवूडमधील सगळ्यांत गाजलेली प्रेमकथा आहे. ‘दो अंजाने’च्या सेटवर ही प्रेमकहाणी बहरली आणि ‘सिलसिला’च्या वळणावर संपली. अमिताभ बच्चन यांनी जया भादुरीसोबत लग्न केले. यादरम्यान अमिताभ यांनी रेखासोबत सीक्रेट मॅरेज केल्याच्याही बातम्या आल्यात. ऋषी कपूर आणि नीतू सिंहच्या लग्नात रेखा भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून पोहोचली, त्यावेळी या बातम्यांना आणखीच ऊत आला. पण कालांतराने या नात्याला काही भविष्य नाही, हे लक्षात आले आणि अमिताभ व रेखाचे मार्ग वेगळे झालेत.

कॅटरिना कैफ- रणबीर कपूर- दीपिका पादुकोण



रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण एकमेकांना भेटले. मग त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे प्रेम. पण रणबीर आपल्यासोबत असताना कॅटरिना कैफच्या प्रेमात अडकल्याचे दिसताच दीपिका त्याच्यापासून वेगळी झाली.  मी दीपिकाला फसवल्याचे खुद्द रणबीरने कबुलीही केले होते. त्याआधी दीपिका-रणबीर आणि सोनम कपूर असा प्रेमत्रिकोणही होता, हे येथे सांगितलेच पाहिजे.

सलमान खान - कॅटरिना कैफ- रणबीर कपूर



कॅटरिनाने करिअरच्या सुरुवातीला सलमान खानला निवडले. पण ‘अजब प्रेम की गजब कहानी’च्या सेटवर कॅटरिना रणबीर कपूरच्या प्रेमात पडली आणि सलमानपासून दुरावली. रणबीरने दीपिकाला फसवून कॅटरिनाला जवळ केले.एकंदर काय तर  रणबीर व कॅटरिनाच्या रिलेशनशिपने दोन ब्रेकअप झालेत. 

शाहिद कपूर- करिना कपूर- सैफ अली खान



मैत्री झाल्यानंतर शाहिद कपूर आणि करिना कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अचानक सैफ अली खानची एन्ट्री झाली अन् शाहिद व करिनाच्या नात्यात दुरावा आला. करिना सैफसोबत अधिक दिसू लागल्यावर तर दोघांचे ब्रेकअपच झाले. ‘टशन’ या चित्रपटानंतर इकडे शाहिद व करिनाच्या वाटा वेगळ्या झाल्यात आणि तिकडे करिना व सैफ एकत्र आलेत.

हर्मन बावेजा- प्रियांका चोप्रा- शाहिद कपूर



‘लव्ह स्टोरी २०५०’ या चित्रपटादरम्यान हर्मन व प्रियांका जवळ आलेत. पण हा चित्रपट आपटला तसेच प्रियांका व हर्मनचे नातेही संपुष्टात आले. यानंतर ‘कमिने’च्या शूटींगदरम्यान प्रियांका शाहिद कपूरच्या प्रेमात बुडाली. अर्थात हे नातेही अर्ध्यावरच संपले.

सुजैन खान- हृतिक रोशन- बार्बरा मोरी



हृतिक रोशनने सन २००० मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण सुजैन खान हिच्यासोबत लग्न केले. पण यानंतरच्या वर्षांत हृतिकच्या अफेअरर्समुळे सुजैन नाराज असल्याच्या बातम्या येत राहिल्यात. ‘काईट्स’ या चित्रपटादरम्यान हृतिक व बार्बरा मोरी या दोघांच्या अफेअरच्या बातम्या प्रचंड गाजल्या. अर्थात सुजैनने याकडे दुर्लक्ष केले. पण सन २०१४ मध्ये सुजैनने हृतिकसोबतचे १७ वर्षांचे नाते संपवत घटस्फोट घेतला.

अभिषेक बच्चन- करिश्मा कपूर- संजय कपूर



अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर या दोघांचा साखरपुडा झाला होता. पण अचानक काहीतरी बिनसले आणि हे लग्न होता होता राहिले. साखरपुडा तुटला आणि करिश्माने अचानक संजय कपूर या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधली. अर्थात करिश्मा व संजयचे नात्याचा शेवटही घटस्फोटाने झाला.

सलमान खान- ऐश्वर्या राय - विवेक ओबेराय



सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण सलमानने ऐश्वर्याला मारहाण केल्याच्या बातम्या बाहेर आल्यात आणि यानंतर सलमान व ऐश्वर्या कायमचे दुरावले. यानंतर ऐश्वर्या राय विवेक ओबेरायच्या जवळ आली. पण हे रिलेशन जितक्या लवकरच सुरु झाले, तितक्याच लवकरच संपलेही.

डिनो मोरिया - बिपाशा बासू- जॉन अब्राहम



 बिपाशा बासू डिनोसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर ‘जिस्म’च्या सेटवर बिपाशा व जॉन अब्राहम जवळ आलेत. त्यांचे रिलेशनशिपही दिर्घकाळ चालले. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. अर्थात आजही बिपाशा व डिनो एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

शिल्पा शेट्टी- अक्षय कुमार- टिष्ट्वंकल खन्ना



‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटादरम्यान शिल्पा शेट्टी व अक्षय कुमार यांचे प्रेम बहरले. शिल्पा अक्षयच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती. पण शिल्पाच्या प्रेमात असतानाच अक्षय त्याची बेस्ट फ्रेन्ड टिष्ट्वंकल खन्ना हिच्याही प्रेमात असल्याचे कळल्यावर शिल्पाला धक्का बसला. अक्षयने टिष्ट्वंकलला निवडले आणि एक प्रेमकथा अधुरी राहिली.

वाणी गणपथी - कमल हासन- सारिका



 कमल हासनने नृत्यांगण वाणी गणपथीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या दहा वर्षांनंतर कमल हासन अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात पडला. सारिकासाठी कमलने वाणीला नाकारले आणि तिच्यासोबत राहू लागला. लग्नाआधी कमल व सारिका या दोघांना दोन मुली झाल्यात. यानंतर दोघांनी लग्न केले. पण हे नातेही तुटले. कमल त्याच्यापेक्षा वयाने अतिशय लहान असलेल्या सिमरन नामक अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाला आणि सारिकाने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

नदिरा जहीर - राज बब्बर- स्मिता पाटील



राज आणि नदिरा हे दोघे नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये भेटले आणि पुढे दोघांनी लग्नही केले. पण यानंतर ‘भीगी पलके’ या चित्रपटाच्या सेटवर राज बब्बर आणि स्मिता पाटील जवळ आलेत. स्मितासोबत लग्न करण्यासाठी राजने नदिराला घटस्फोट दिला. स्मिताच्या निधनानंतर राज पुन्हा नदिराकडे परतला.

योगिता बाली- मिथुन चक्रवर्ती- श्रीदेवी



मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी या दोघांनी १९८० मध्ये सीक्रेट मॅरेज केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी मिथुन योगिता बालीचा पती होता. मिथुन आपल्या पत्नीला सोडू शकत नाही आणि आपल्यासोबतचे नाते जाहिरपणे स्वीकारू शकत नाही, हे लक्षात आल्यावर श्रीदेवीने त्याच्यासोबतचे नाते तोडणेच योग्य समजले.

मोना शौरी- बोनी कपूर- श्रीदेवी



मिथुनसोबत नाते तोडल्यावर श्रीदेवी दोन मुलांचा बाप असलेल्या बोनी कपूरच्या पे्रमात पडली. लग्नाआधीच श्रीदेवी बोनीच्या बाळाची आई होणारअसल्याचे कळले तेव्हा मोना व बोनी वेगळे झालेत. यानंतर बोनी कपूर व श्रीदेवी दोघांनी लग्न केले.

पूनम चंद्रमानी- शत्रुघ्न सिन्हा- रिना राय



शत्रुघ्न सिन्हा आणि रिना राय तेव्हा आॅन-स्क्रीन आणि आॅफ स्क्रिन कपल होते.  शत्रुघ्न सिन्हा विवाहित आहे, हे माहित असूनही रिना राय त्याच्याशी लग्न करायला तयार होती. पण पूनम सिन्हाला सोडायला शत्रुघ्नने रिनाला नकार दिला. मग काय, हे नाते संपवण्याशिवाय रिनाकडे कुठलाच पर्याय उरला नाही.

 











Web Title: B-town's real life love affair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.