Baahubali 2 : अंगावर शहारे आणणारे आयमॅक्स पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2017 03:59 PM2017-04-12T15:59:01+5:302017-04-12T21:29:01+5:30

भारतातील मोजकेच असे चित्रपट आहेत, ज्यांना पूर्णपणे आयमॅक्स रिलिज मिळाली आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘बाहुबली २’ हा चित्रपट ...

Baahubali 2: Aimax posters bringing ammunition! | Baahubali 2 : अंगावर शहारे आणणारे आयमॅक्स पोस्टर!

Baahubali 2 : अंगावर शहारे आणणारे आयमॅक्स पोस्टर!

googlenewsNext
रतातील मोजकेच असे चित्रपट आहेत, ज्यांना पूर्णपणे आयमॅक्स रिलिज मिळाली आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘बाहुबली २’ हा चित्रपट होय. खरं तर या चित्रपटाला आयमॅक्स रिलिज मिळायलाच हवी, कारण या चित्रपटात जबरदस्त व्हिजुअल्स, दमदार वी. एफ. एक्स आणि श्वास रोखून ठेवणारे वॉर सिक्वेन्स आहेत. काही वेळापूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाचे आयमॅक्स पोस्टर रिलिज केले असून, त्यात प्रभास दमदार अंदाजात बघावयास मिळत आहे. 

या पोस्टर लॉन्चदरम्यान दिग्दर्शक एस. एस. राजामौली, कॅमेरामन सेंथिल कुमार आणि इतर टीम मेंबर्स उपस्थित होते. हे पोस्टर चित्रपटातीलच एका सीन्सवरून बनविण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रभास एका मोठ्या लाकडावरून धावताना दिसत आहे. हे पोस्टर बघितल्यानंतर चित्रपटातील थराराचा अंदाज लावणे सहज शक्य होत आहे. तसेच ज्या प्रेक्षकांनी ‘बाहुबली’ हा पहिला भाग बघितला असेल त्यांना हे पोस्टर बघितल्यानंतर दुसºया भागाची प्रचंड आतुरता लागेल यात शंका नाही.  



‘बाहुबली २’मध्ये प्रभास डबल नव्हे तर ट्रिपल रोलमध्ये बघावयास मिळणार आहे. ज्यामध्ये तो मुलाची आणि वडिलांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्या म्हणण्यानुसार ‘बाहुबली २’मध्ये सगळं काही जबरदस्त असेल. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना भावणार यात शंका नाही. दरम्यान ‘बाहुबली २’ २८ एप्रिल रोजी रिलिज होणार आहे. प्रमोशनदरम्यान या चित्रपटाशी संबंधित दररोज काही ना काही घडामोडी समोर येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त आतुरता निर्माण होत आहे. जेव्हा हा चित्रपट रिलिज होईल तेव्हा प्रेक्षक त्यास कसा प्रतिसाद देतील हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Baahubali 2: Aimax posters bringing ammunition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.