'बाजीगर'ची ३० वर्ष! काजोलने शेअर केले Unseen Photo, म्हणाली, "जेव्हा मी शाहरुखला पहिल्यांदा भेटले..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 11:48 AM2023-11-12T11:48:46+5:302023-11-12T11:52:53+5:30

'बाजीगर'च्या सेटवर शाहरुखला पहिल्यांदा भेटलेली काजोल, अभिनेत्रीने शेअर केले सेटवरील फोटो

baazigar movie completed 30 years kajol first met shah rukh khan on this movie set shared unseen photo | 'बाजीगर'ची ३० वर्ष! काजोलने शेअर केले Unseen Photo, म्हणाली, "जेव्हा मी शाहरुखला पहिल्यांदा भेटले..."

'बाजीगर'ची ३० वर्ष! काजोलने शेअर केले Unseen Photo, म्हणाली, "जेव्हा मी शाहरुखला पहिल्यांदा भेटले..."

बॉलिवूडमधील काही चित्रपट हे एव्हरग्रीन आहे. काळ बदलला असला तरी या चित्रपटांची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'बाजीगर'. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. काजोल आणि शाहरुख खान ही जोडी पहिल्यांदाच या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या नव्या कोऱ्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या बाजीगरला आज ३० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने काजोलने काही unseen फोटो शेअर केले आहेत. 

'बाजीगर' चित्रपटाबाबत काजोलने खास पोस्टही लिहली आहे. "बााजीगरला ३० वर्ष पूर्ण... माझ्या अनेक पहिल्या गोष्टींचा या चित्रपटाचा सेट साक्षीदार आहे. पहिल्यांदाच मी सरोजजींबरोबर काम केलं. या सेटवरच मी पहिल्यांदा शाहरुख खानला भेटले. अनु मलिक यांची पहिली भेटही याच सेटवर झाली. अब्बास भाई आणि मुस्तान भाई यांनी मला लाडक्या बाळाप्रमाणे प्रेम दिलं होतं. शिल्पा शेट्टी, जॉनी लिव्हर यांना मी कशी काय विसरू शकते. खूप साऱ्या चांगल्या आठवणी आणि थांबवता न येणारं हसू...या चित्रपटातील प्रत्येक गाणं आणि डायलॉग आजही माझ्या चेहऱ्यावर हसू आणतं," असं काजोलने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

काजोल आणि शाहरुखची पहिली भेट 'बाजीगर'च्या सेटवर झाली होती. चित्रपटातील त्यांची जोडी हिट ठरली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने ते पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र दिसले होते. त्यानंतर' कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे',' करण अर्जुन', 'कभी अलविदा ना कहना' अशा चित्रपटांत ते एकत्र काम करताना दिसले. 

'बाजीगर' चित्रपटा काजोल आणि शाहरुखबरोबरच शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ राय या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 'बाजीगर'मधील 'ये काली काली आखें', 'बाजीगर ओ बाजीगर' ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. 

Web Title: baazigar movie completed 30 years kajol first met shah rukh khan on this movie set shared unseen photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.