'केवढी ती ओव्हरअॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:50 IST2024-05-15T13:49:59+5:302024-05-15T13:50:38+5:30
इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan)

'केवढी ती ओव्हरअॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला...
दिवंगत अभिनेता इरफान खानचा लेक बाबील खान हा हळूहळू बॉलिवूडमध्ये स्वतःचा जम बसवतोय. बाबीलने मोजक्याच सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक सर्वांना दाखवून मन जिंकलंय. बाबील कायमच मोठमोठ्या इव्हेंटमध्ये वरिष्ठ व्यक्तींसोबत नम्रपणे वागताना दिसलाय. पण हीच त्याची वागणूक काही जणांना खटकल्याचं दिसतंय. काही जणांनी त्याला ओव्हरअॅक्टींग करतो असं म्हटलंय. आता याच ट्रोलर्सना बाबीलने खणखणीत उत्तर दिलंय.
बाबीलने ट्रोलर्सना उत्तर देताना म्हटलंय की.. "हाय, मी बाबिल आहे. तुम्हाला वाटतं की मी खोटा आहे, मी ढोंगी आहे. तुम्हाला वाईट वाटलं असल्यास मी माफी मागतो. पण ज्या पद्धतीने मला वाढवलं गेलंय तसाच मी वागतो. मी काही ठरवून असा वागत नाही." अशाप्रकारे बाबीलने ट्रोलर्सना उत्तर दिलंय. बाबील खानचं काहीच दिवसांपुर्वी ब्रेकअप झाल्याचीही चर्चा आहे.
का ट्रोल झाला बाबील?
झालं असं की.. एका इव्हेंटमध्ये बाबील सहभागी झाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत बाबील फोटोशूटसाठी उभा असतो. इतक्यात त्याला एक महिला येताना दिसते. बाबील पटकन बाजूला होतो. आणि सॉरी म्हणत त्या महिलेला येण्यास सांगतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच बाबीलला लोकांनी ट्रोल केलंय. केवढी ती ओव्हरअॅक्टींग असं म्हणत बाबीलच्या अतिनम्र स्वभावावर लोकांनी ताशेरे ओढले आहेत.