Bachchan Pandey Movie Review: अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'नं वाढवली होळीची शान, 'फुल्ल टू पैसा वसूल !'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 01:34 PM2022-03-18T13:34:52+5:302022-03-18T13:35:55+5:30
Akshay Kumar's Bachchan Pandey Movie Review: जाणून घ्या कसा आहे, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' चित्रपट?
कलाकार - अक्षय कुमार(Akshay kumar), क्रिती सनॉन (Kriti sanon), अर्शद वारसी (Arshad warsi), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), संजय मिश्रा (Sanjay Mishra), जैकलीन फर्नांडीज (Jacqueline fernandez) और अभिमन्यु सिंह (Abhimanyu Singh)
दिग्दर्शक - फरहद सामजी ( Farhad Samji)
कालावधी - २ तास २६ मिनिटं
होळीच्या निमित्ताने अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey Movie) चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालाय. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत क्रिती सनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिमन्यू सिंगसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. एण्टरटेन्मेंट, हाउसफुल ३ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक फरहद सामजी यांनी बच्चन पांडेचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटात मायरा देवेकर (क्रिती सनॉन)ला एक चित्रपट बनवायचा असतो आणि तोही कोणत्यातरी गँगस्टरवर. ती अशा गँगस्टरच्या शोधात असते आणि अखेर तिचा हा शोध थांबतो तो बच्चन पांडे(अक्षय कुमार)वर. बच्चन पांडे हा बघवातील असा गँगस्टर आहे ज्याचा एक डोळा दगडाचा आहे. त्याचा डोळाच दगडाचा नाही आहे तर त्याचे मनदेखील कठोर आहे. तो कोणालाही जीवे मारताना एक मिनिटंदेखील विचार करत नाही. मायराला बच्चन पांडेवर सिनेमा बनवण्यासाठी त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचे असते. त्यासाठी ती तिचा मित्र विशु (अर्शद वारसी) सोबत बघवा येथे जाते. इथून सुरूवात होते ती अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि मारामारीला. बच्चन पांडेवर चित्रपट बनवण्यात मायरा यशस्वी ठरते का की बच्चन पांडेच्या हातून ती आणि तिचा मित्र मरतो, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
बच्चन पांडे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी खूप छान झाली आहे, ही या चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. यातील कॉमिक सीन्स खूप मजेशीर आहेत. अभिनयाबद्दल सांगायचे तर अक्षय कुमार अँटी हिरो टाईप कॅरेक्टरमध्ये चांगला दिसत असून जबरदस्त अॅक्शन करताना दिसतो आहे. क्रिती सनॉनने चित्रपट निर्मात्या मायराच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. दुसरीकडे, अर्शद वारसी तिचा मित्र विशूच्या पात्रात परफेक्ट दिसत आहे. याशिवाय पंकज त्रिपाठीने नेहमीप्रमाणे या चित्रपटातही दमदार काम केले आहे. तसेच संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग, प्रतीक बब्बर यांनीही उत्तम काम केले आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसने मेहबूबा सूफीची भूमिका केली आहे. तिची भूमिका छोटीशी असली तरी तिचे पात्र चांगलेच लक्षात राहते. अक्षय कुमारचा हटके अंदाज पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.