​चालत्या कारचे मागचे चाक निखळले; थोडक्यात बचावले अमिताभ बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 07:33 AM2017-11-16T07:33:41+5:302017-11-16T13:06:42+5:30

गत आठवड्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी कोलकात्यातील २३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.  त्यांच्याशिवाय किंगखान शाहरूख खान, ...

The back wheels of the moving car slopes; Amitabh Bachchan saved briefly! | ​चालत्या कारचे मागचे चाक निखळले; थोडक्यात बचावले अमिताभ बच्चन!

​चालत्या कारचे मागचे चाक निखळले; थोडक्यात बचावले अमिताभ बच्चन!

googlenewsNext
आठवड्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी कोलकात्यातील २३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.  त्यांच्याशिवाय किंगखान शाहरूख खान, अभिनेत्री काजोल, साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि दिग्दर्शक मुकेश भट्ट आदी या महोत्सवाच्या उद्घाटनला उपस्थित होते. या सोहळ्याचे  काही फोटोही आपण पाहिले होते. याच महोत्सवावरून परतताना अमिताभ बच्चन थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. होय, हा सोहळा आटोपून मुंबईकडे रवाना होण्यासाठी विमानतळाकडे निघालेल्या अमिताभ यांच्या मर्सिडिज कारला अपघात झाला. या अपघातातून अमिताभ केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावले.

पश्चिम बंगाल सरकारच्या निमंत्रणानंतर अमिताभ कोलकाता फिल्म्स फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी कोलकात्यात पोहोचले होते. गत शनिवारी म्हणजे गत ११ नोव्हेंबरला सकाळी बिग बी मुंबईला रवाना होणार होते. सकाळी सकाळी ते विमानतळाकडे निघाले. याचदरम्यान डुफ्फेरिन रोडवर त्यांच्या मर्सिडिज कारचे मागचे चाक गाडीपासून वेगळे झाले. यामुळे कारवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. सुदैवाने या अपघातात अमिताभ यांना कुठलीच दुखापत झाली नाही. पश्चिम बंगाल सरकारने मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून, संबंधित ट्रव्हल एजन्सीला नोटिस जारी केले आहे. याच ट्रॅव्हल एजन्सीने अमिताभ यांच्यासाठी ही कार उपलब्ध करून दिली होती. सचिवालयाच्या एका अधिकाºयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ALSO READ: आराध्या बच्चन झाली सहा वर्षांची ! आजोबांनी शेअर केला क्यूट फोटो!!

२ आॅगस्ट १९८२ मध्ये अमिताभ यांना ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर गंभीर अपघात झाला होता. या अपघातातून अमिताभ मृत्युच्या दाढेतून परतले होते.  बिग बी मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’  सिनेमाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना सिनेमासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला होता. २ आॅगस्ट रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले होते. पुढे बरे झाल्यानंतर अमिताभ यांनी ‘कुली’ चे शूटिंग पूर्ण केले. हा सिनेमा खूप गाजला होता.  

Web Title: The back wheels of the moving car slopes; Amitabh Bachchan saved briefly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.