वयाच्या १५ व्या वर्षी रेखाला सामना करावा लागला होता या वाईट अनुभवाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 04:59 AM2017-10-10T04:59:32+5:302017-10-10T10:29:32+5:30
रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला चेन्नईमध्ये झाला होता. तिचे वडील जेrekha motherमिनी गणेशन हे प्रसिद्ध तमीळ अभिनेते होते ...
र खाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला चेन्नईमध्ये झाला होता. तिचे वडील जेrekha motherमिनी गणेशन हे प्रसिद्ध तमीळ अभिनेते होते तर तिची आई पुष्पावल्ली ही प्रसिद्ध तमीळची अभिनेत्री होती. घरातच अभिनयाचा वारसा लाभल्याने अतिशय लहान वयात रेखाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रेखाचे वडील प्रसिद्ध अभिनेते असले तरी तिला अतिशय लहान वयापासून संघर्ष करावा लागला. अभिनय क्षेत्राची निवड तिने एक आवड म्हणून केली नव्हती तर घरात आर्थिक चणचण भासत असल्याने ती या क्षेत्राकडे वळली. १९६६ ला रंगीला रत्नम या तमीळ चित्रपटाद्वारे तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. लहान वयात या इंडस्ट्रीत आल्याने तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. या गोष्टींचा रेखाने रेखाः द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात उल्लेख केला आहे.
अंजाना सफर या चित्रपटाच्या वेळी रेखा केवळ पंधरा वर्षांची होती. त्यावेळी तिला अतिशय वाईट अनुभवाचा सामना करावा लागला होता. विश्वजीत चॅटर्जी या चित्रपटाचा हिरो होता. या चित्रपटाच्या एका दृश्याच्या चित्रीकरणासाठी विश्वजीतने रेखाला जवळ घेतले आणि त्यानंतर तिच्या ओठावर चुंबन दिले. हा किसिंग सीन जवळजवळ पाच मिनीटे सुरू होता. हा सीन संपल्यावर उपस्थित लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवल्या होत्या. पण रेखा दिवसभर प्रचंड रडली होती. तिला काय झाले काहीच कळत नव्हते. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा नवाथे आणि विश्वजीत यांनी रेखाला त्या दृश्याविषयी काहीच कल्पना दिली नव्हती. इतक्या लहान वयात अशाप्रकारचे दृश्य द्यायला लागले याचे तिला खूपच दुःख वाटले होते.
रेखाचे आयुष्य नेहमीच विवादातच राहिले आहे. विनोद मेहरासोबत रेखाने लग्न करणे त्याच्या कुटुंबाला रुचले नव्हते. रेखा विनोदच्या आईच्या पाया पडायला गेली असता त्यांनी तिला चक्क ढकलून दिले होते. एवढेच नाही तर तिला मारण्यासाठी त्यांनी चप्पल देखील काढली होती आणि रेखाला त्यांनी घरात देखील घेतले नव्हते.
Also Read : जेव्हा रेखा यांनी स्वतःविषयी केला होता हा मोठा खुलासा?