‘ठग्स’चे अपयश ‘बधाई हो’च्या पथ्यावर, २५ व्या दिवसांनंतरही घोडदौड सुरू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:43 IST2018-11-12T15:38:55+5:302018-11-12T15:43:04+5:30
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाचा दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही थांबलेली नाही.

‘ठग्स’चे अपयश ‘बधाई हो’च्या पथ्यावर, २५ व्या दिवसांनंतरही घोडदौड सुरू!!
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाचा दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही थांबलेली नाही. आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ रिलीज झाल्यानंतर ‘बधाई हो’ची कमाई थंड पडेल, असा अंदाज होता. पण ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ने पे्रक्षकांची निराशा केली आणि याचा थेट फायदा ‘बधाई हो’ला झाना. हेच कारण आहे की, रिलीजनंतरच्या २५ दिवसांतही ‘बधाई हो’ने बॉक्सआॅफिसवर कब्जा जमवला आहे. २५ व्या दिवशी या चित्रपटाने २.४५ कोटी कमावलेत, यावरून याचा अंदाज यावा. आत्तापर्यंत या चित्रपटाने ११५.५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २५ दिवसांनंतरही आयुष्यमान खुराणा व सान्या मल्होत्राचा हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. हे आकडे बघता, या चित्रपटाचा लाईफटाईम बिझनेस १२५ कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.
‘बधाई हो’ हा आयुष्यमानचा पहिला १०० कोटी क्लबचा चित्रपट आहे. यापूर्वी आयुष्यमानच्या कुठल्याही चित्रपटाला हा टप्पा ओलांडता आला नव्हतो. या चित्रपटासोबतचं आयुष्यमान ए-लिस्ट अॅक्टर्सच्या यादीत सामील झाला आहे. साहजिकचं आयुष्यमान यामुळे प्रचंड आनंदात आहे. आता पे्रक्षक माझ्यावर विश्वास करू लागलेत. मेकर्सचाही विश्वास वाढला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा हा विश्वास टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आता येऊन पडलीय, असे आयुष्यमान अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. ‘बधाई हो’मध्ये आयुष्यमान व सान्याशिवाय नीना गुप्ता, गजराज राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाचेही वारेमाप कौतुक होतेय.