रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 11:02 IST2019-03-03T10:59:31+5:302019-03-03T11:02:47+5:30

एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

badla film main culprit in amitabh bachchan and taapsee pannu film secret out | रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!!

रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!!

ठळक मुद्दे ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरूखच्या रेड चिली एंटरटेनमेंटने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे.

अमिताभ बच्चनतापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमधून हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले. एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटातील खरा विलेन कोण, हा खरा सस्पेन्स आहे. पण आता चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच या रहस्यावरूनही पडदा उठला आहे.


होय, डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, तापसीचा पती हाच या चित्रपटातील खरा विलेन असतो. तापसीच्या पतीची ही भूमिका मानव कौल साकारतोय. या चित्रपटात शाहरूख खान कॅमिओ रोलमध्ये आहे. शाहरूख हाच असला मारेकरी असतो, असे मानले गेले होते. पण आता मानव कौल हाच खरा खूनी असतो, अशी चर्चा आहे. अमृता सिंग ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 
 ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरूखच्या रेड चिली एंटरटेनमेंटने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्याही खूप अपेक्षा या चित्रपटाकडून आहेत. बºयाच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये क्राईम- थ्रिलर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबद्दल खूपच कुतूहल आहे. आता हे कुतूहल कसे शमते, ते बघूच.

Web Title: badla film main culprit in amitabh bachchan and taapsee pannu film secret out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.