'बदो बदी' फेम गायक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होण्यास इच्छुक; म्हणतो..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:20 PM2024-06-17T12:20:24+5:302024-06-17T12:21:44+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बदो बदी फेम गायक पाकिस्तान क्रिकेट संघ T 20 मधून बाहेर पडल्याने संताप व्यक्त करताना मोठं विधान केलंय (badi badi, chahat fateh ali khan)
काही दिवसांपुर्वी युट्यूबवरून 'बदो बदी' गाणं डिलीट झालं. या गाण्याचे गायक चाहत फतेह अली खान या प्रकरणामुळे चर्चेत आले. सोशल मीडियावर 'बदो बदी' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. रील्सच्या माध्यमातून हे गाणं व्हायरल झालं. पण काही दिवसांपुर्वी युट्यूबवरुन अचानक हे गाणं हटवल्याने चाहत फतेह अली खान भावूक झालेले दिसले. अशातच चाहत यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. पाकिस्तान T 20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्याने त्यांनी राग व्यक्त करत मोठं विधान केलंय.
चाहत पाकिस्तान क्रिकेटविषयी काय म्हणाले?
पाकिस्तान क्रिकेट संघाला T 20 वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे चाहत फतेह अली खान यांनी क्रिकेट संघावर राग व्यक्त केला. ते म्हणाले, "जर मला पीसीबीचा (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) अध्यक्ष बनवलं तर मी वैयक्तिकरित्या सर्व खेळाडू पारखून घेईन. याशिवाय सर्व खेळाडूंवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवेल. पाकिस्तान खेळाडूंना आठवड्यातून चार दिवस कोचिंग देईल. सध्या जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर मी टीका करत नाहीय. मी फक्त माझा प्रस्ताव मांडत आहे. मला पीसीबी अध्यक्ष बनवायला हवे." असं विधान केल्याने चाहत यांना लोकांच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे.
Special Interview in London pic.twitter.com/ITjM5fjgwL
— Chahat Fateh Ali Khan (@chahat_fateh) June 15, 2024
पाकिस्तानतर्फे चाहत यांनी क्रिकेट खेळलंय
हो तुम्ही बरोबर वाचताय. पाकिस्तानतर्फे चाहत फतेह अली खान यांनी क्रिकेट खेळले आहेत. चाहत पाकिस्तानकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. त्यांचे खरे नाव काशिफ राणा आहे. चाहत फतेह अली खान यांनी 1983-84 या वर्षात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यांनी २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्याच्या तीन डावात चाहतने केवळ १६ धावा केल्या होत्या. यानंतर त्यांनी १२ वर्षे ब्रिटनमध्ये क्लब क्रिकेटही खेळले. त्यामुळे भविष्यात चाहत यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष बनवलं तर वावगं वाटायला नको.