बाबो ! रॅपर बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:10 IST2022-05-09T13:06:33+5:302022-05-09T13:10:18+5:30
बादशाह सध्या सोशल मीडियावर त्याने खरेदी केलेल्या नव्या गाडीमुळे चर्चेत आहे..

बाबो ! रॅपर बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून व्हाल अवाक्
रॅपर बादशाहने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. काही महिन्यांपूर्वी त्याने 'खानदानी शफाखाना' या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. बादशाहाचा जन्म दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला. बादशाहचे खरं नाव आदित्य प्रतिक सिंग सिसौदिया आहे. बॉलीवूडमध्ये मात्र तो बादशाह नावावने ओळखला जातो. 2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते. बादशाह सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ते त्याने खरेदी केलेल्या नव्या गाडीमुळे..
रॅपर बादशाहने ऑडीची सर्वात महागडी SUV K8 खरेदी केली आहे. बादशाहने खरेदी केलेल्या या कारची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. बादशाहने त्याच्या कारसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंपनीने कारमध्ये ते सर्व फिचर्स दिले आहेत जे लक्झरी कारमध्ये असावेत.
फोटो शेअर करताना बादशाहने लिहिले – डायनॅमिक, स्पोर्टी, अगदी माझ्यासारखी आहे ही कार. #Audi Q8 सह माझ्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी उत्साहित आहे. Audi Q8 Coupe SUV च्या टॉप मॉडेलची किंमत 1.38 कोटी रुपयांपर्यंत आहे. कार खरेदी केल्याबद्दल चाहत्यांनी बादशाहचे अभिनंदन केले आहे.