पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला भारतातील 'हे' शहर फिरायचं, बादशाहसोबत खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:26 IST2024-12-25T15:25:43+5:302024-12-25T15:26:35+5:30
पाकिस्तानात तर तिचा मोठा चाहतावर्ग आहेच. पण, भारतामध्येही तिची लोकप्रियता खूप आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला भारतातील 'हे' शहर फिरायचं, बादशाहसोबत खास कनेक्शन
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Aamir) खूप चर्चेत आहे. लॉलिवूडमध्ये हानिया आमिर तिच्या कामापेक्षाही तिच्या दिसण्यामुळे फारच प्रसिद्ध आहे. जसं भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड म्हटलं जातं, त्याचप्रमाणे बॉलिवूडच्या धर्तीवर पाकिस्तानी चित्रपटसृष्टीला लॉलिवूड म्हणून ओळखलं जातं. पाकिस्तानात तर तिचा मोठा चाहतावर्ग आहेच. पण, भारतामध्येही तिची लोकप्रियता खूप आहे.
प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहसोबतच्या मैत्रीमुळेही हानिया चर्चेत असते. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण, दोघांनीही ते एकमेंकाचे चांगले मित्र असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच हानियानं 'मॅशेबल मिडल ईस्ट'ला मुलाखत दिली. यावेळी रणविजय सिंहनं तिला भारतात कुठे जायला आवडेल, हा प्रश्न केला. यावर हानियानं 'चंदीगढ' शहर फिरण्याची इच्छा व्यक्त केली. 'चंदीगढ' हेच शहर का असा प्रश्न केल्यावर हानियानं उत्तर दिले की, 'बादशाह याच ठिकाणचा असल्यामुळे तिला चंदीगडला जायला आवडेल'.
हानिया आमिरने 'दिलरुबा', 'तितली', 'इश्किया', 'संग-ए-माह' आणि 'मुझे प्यार हुआ था' यांसारख्या पाकिस्तानी नाटकांमध्ये आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिची कभी मै कभी तुम ही मालिका नुकतीच संपली आहे. हानीया आमीरने या मालिकेत शर्जिना हे पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेला जगभरातून प्रेम मिळत आहे.पाकिस्तानातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.