शॉकिंग! ‘बाहुबली’ प्रभासच्या डोक्यावर 1000 कोटींचं कर्ज, लॉकडाऊननं मोडलं कंबरडं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:10 PM2021-02-16T12:10:20+5:302021-02-16T12:12:17+5:30

‘बाहुबली’ या सिनेमानंतर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार प्रभास बद्दलची ही बातमी वाचाल तर हैराण व्हाल.

bahubali fame prabhas is in huge debt due to coronavirus | शॉकिंग! ‘बाहुबली’ प्रभासच्या डोक्यावर 1000 कोटींचं कर्ज, लॉकडाऊननं मोडलं कंबरडं!!

शॉकिंग! ‘बाहुबली’ प्रभासच्या डोक्यावर 1000 कोटींचं कर्ज, लॉकडाऊननं मोडलं कंबरडं!!

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रभासने तेलुगु सिनेमातून सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता बॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही.

‘बाहुबली’ या सिनेमानंतर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार प्रभास याच्याबद्दलची ही बातमी वाचाल तर हैराण व्हाल. होय, प्रभासबद्दलची एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. ‘बाहुबली’ फेम प्रभास 1000 कोटी रूपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. त्याच्यावर 1 हजार कोटी रूपयांचे कर्ज असल्याचे कळतेय.

गेल्या वर्षात कोरोना महामारीमुळे भल्याभल्यांचे कंबरडे मोडले. अनेकांच्या नोक-या गेल्यात. रोजगार बुडाले. उद्योगधंदे ठप्प पडलेत. सिनेसृष्टीचेही अतोनात नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टी ठप्प पडली. सुपरस्टार प्रभासही यातून सुटला नाही. प्रभासच्या ‘युवी क्रिएशन्स’ आणि व्ही सेल्युलाइड या प्रॉडक्शन कंपनीला कोट्यवधी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले.   यामुळे प्रभासवर कर्ज घेण्याची पाळी आली. प्रभासच्या युवी किएशन्स व व्ही सेल्युलाईडवर सध्या 1 हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज अस्ल्याचे कळतेय.

आता प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स ‘राधे श्याम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले असून 30 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. साहजिकच या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे.  
  राधे श्याम व्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सालार आणि नाग अश्विनच्या मल्टीस्टारर  ‘साय-फाय’ या चित्रपटातही प्रभास दिसणार आहे.

 प्रभासने तेलुगु सिनेमातून सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता बॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. 'बाहुबली'नंतर जगभरात त्याच्या फॅनफॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे.  प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'ईश्वर' या तेलुगु सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती.

Web Title: bahubali fame prabhas is in huge debt due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास