‘बाहुबली’ प्रभास लग्नासाठी तयार...अनुष्का नाही, ‘ही’ बनणार ‘मिसेस परफेक्ट’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 10:20 AM2017-05-30T10:20:30+5:302017-05-30T15:50:30+5:30
एंन्टरटेनमेंट इंडस्ट्रीत सेलिब्रिटींच्या लिंकअपच्या बातम्या आता कॉमन झाल्या आहेत. सध्या लिंकअप लिस्टमध्ये सगळ्यात हॉट टॉपिक आहे, ‘बाहुबली’ स्टार प्रभास ...
ए न्टरटेनमेंट इंडस्ट्रीत सेलिब्रिटींच्या लिंकअपच्या बातम्या आता कॉमन झाल्या आहेत. सध्या लिंकअप लिस्टमध्ये सगळ्यात हॉट टॉपिक आहे, ‘बाहुबली’ स्टार प्रभास अन् अनुष्का शेट्टी यांच्या लिंकअपचे. प्रभास व अनुष्काच्या लिंकसोबतच अनेक वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. दोघेही एकमेकांना डेट करत असतील तर लग्न करणार का? करणार असतील तर कधी करणार? असे सगळे प्रश्न होते. अनुष्का व प्रभासचे लग्न व्हावे, असेच त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण आता आम्ही एक वेगळीच बातमी घेऊन आलो आहोत. होय, आत्तापर्यंत लग्नासाठी तयार नसलेला प्रभास आता बोहल्यावर चढण्यास तयार झाल्याची खबर आहे. प्रभासने म्हणे, लग्नासाठी होकार दिलाय. पण, थांबा....थांबा...! अनुष्कासोबत नाही तर एका उद्योगपतीच्या नातीसोबत. चर्चा खरी मानाल तर, प्रभाससाठी रासी सिमेंटचे चेअरमन भूपति राजा यांच्या नातीचे स्थळ आले आहे. अर्थात याबाबत प्रभास वा त्याच्या कुटुंबीयाकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.
ALSO READ : MUST READ : अमेरिकेतील महिनाभराच्या सुट्टीत प्रभासने काय काय केले?
‘बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभासचे नाव जोडले जात आहे. अनुष्का शेट्टी दोन वर्षांपूर्वी लग्न करणार होती. पण प्रभासने तिला लग्न करण्यापासून रोखले, अशीही बातमी होती. अनुष्काने लग्नापेक्षा आपले सगळे लक्ष ‘बाहुबली2’वर केंद्रीत करावे, असे प्रभासचे मत होते. ‘बाहुबली’साठी प्रभासने स्वत:चे लग्नही पाच वर्षे लांबणीवर टाकले होते. कारण त्याला केवळ आणि केवळ ‘बाहुबली’वर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रभास ‘बाहुबली2’चे शूटींग करत असताना त्याा ६ हजार मुलींनी लग्नाची मागणी घातली होती. पण प्रभासने सर्वांना नकार दिला, होता. अर्थात आता एकीला प्रभास होकार देण्यासाठी राजी झालाय. आता यापुढची बातमी कधी येतेय, ते बघुयात!