अमेरिकेत चाहत्यांच्या भव्य स्वागताने भावुक झाला ‘बाहुबली’ प्रभास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2017 04:34 PM2017-05-13T16:34:30+5:302017-05-13T22:06:04+5:30

‘बाहुबली-२’मध्ये काम करणाºया प्रत्येक कलाकाराला भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. साउथ इंडस्ट्रीमधील असतानाही या कलाकारांनी जगभरात असा ...

'Bahubali' Prabhas became passionate about the fans in America! | अमेरिकेत चाहत्यांच्या भव्य स्वागताने भावुक झाला ‘बाहुबली’ प्रभास!

अमेरिकेत चाहत्यांच्या भव्य स्वागताने भावुक झाला ‘बाहुबली’ प्रभास!

googlenewsNext
ाहुबली-२’मध्ये काम करणाºया प्रत्येक कलाकाराला भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. साउथ इंडस्ट्रीमधील असतानाही या कलाकारांनी जगभरात असा काही डंका वाजविला की, प्रत्येकजण त्यांची एक झलक बघण्यासाठी आतुर झाले आहेत. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा बाहुबली अर्थात प्रभास याचे अमेरिकेच्या विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. प्रभास विमानतळावर पोहोचताच त्याच्या फॅन्सनी त्याला घेराव घातला. शिवाय त्याचे ग्रॅण्ड वेलकमही केले. चाहत्यांचे प्रेम बघून प्रभास भावुक झाला होता. 

सध्या सगळीकडेच ‘बाहुबली-२’चा डंका वाजत आहे. या चित्रपटासाठी लोक आजही थिएटर्समध्ये गर्दी करीत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या हृदयात बसले आहे. खरं तर याची झलक चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बघावयास मिळाली होती. फॅन्सनी प्रभासचे भले मोठे कट आउट उभारून त्याला दुधाने अभिषेक घातला होता. आतापर्यंत साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्याबाबत असे दृश्य बघावयास मिळाले आहे. मात्र प्रभासला चाहत्यांनी हा दर्जा दिल्याने चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो. 

वृत्तानुसार जेव्हा प्रभास अमेरिकेच्या विमानतळावर उतरला तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रेक्षकांचे प्रेम बघून प्रभास खूपच भावुक झाला होता. खरं तर प्रभास खूपच लाजाळू स्वभावाचा आहे. त्याला पब्लिक प्लेसमध्ये सर्वसामान्य लोकांप्रमाणे राहणे आवडते. त्यामुळे तो नेहमीसारखाच अमेरिकेच्या विमानतळावर पोहोचला. परंतु अचानकच त्याच्या चाहत्यांनी त्याला घेराव घालत भव्य स्वागत केल्याने तो भारावून गेला. चाहत्यांचे आभार कसे व्यक्त करावे, हे त्याला काही काळ सुचलेच नाही. यावेळी तो खूपच इमोशनल झाल्याचे दिसत होते. 

प्रभासने या चित्रपटासाठी आपल्या करिअरमधील तब्बल पाच वर्ष दिले आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त त्याने एकाही प्रोजेक्टमध्ये काम केले नाही. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्यानुसार, प्रभासला चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच विश्वास होता की, हा चित्रपट कोट्यवधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणार. प्रमोशनदरम्यान तर राजामौली प्रभासचे आभार व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नव्हते. वारंवार त्याने केलेल्या पाच वर्षांच्या मेहनतीचे ते दाखले देत होते. 

प्रभास त्याच्या या पाच वर्षांच्या मेहनतीतून ब्रेक घेण्यासाठी अमेरिकेला सुट्या साजरा करण्यासाठी गेला होता. असो, ‘बाहुबली-२’च्या बॉक्स आॅफिसवरील कलेक्शनचा विचार केल्यास या चित्रपटाने आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही चित्रपट जबरदस्त बिझनेस करीत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: 'Bahubali' Prabhas became passionate about the fans in America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.