बॉलिवूडच्या काही बड्या लोकांचे ISI व पाक आर्मीशी कनेक्शन, भाजपा नेत्याच्या गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 06:05 PM2020-07-22T18:05:53+5:302020-07-22T18:08:30+5:30

भाजप नेते बैजयंत जय पांडा एक धक्कादायक विधान करून पुरती खळबळ उडवून दिली आहे.

Baijayant Jay Panda Claims Some Bollywood Celebs Have Verifiable Links to ISI and Pak Army | बॉलिवूडच्या काही बड्या लोकांचे ISI व पाक आर्मीशी कनेक्शन, भाजपा नेत्याच्या गौप्यस्फोट

बॉलिवूडच्या काही बड्या लोकांचे ISI व पाक आर्मीशी कनेक्शन, भाजपा नेत्याच्या गौप्यस्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधी भाजपाचे दिग्गज नेते बीएल संतोष यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमच्या मुद्यावरून रोज नवे आरोप प्रत्यारोप ऐकायला मिळत असताना आता भाजप नेते बैजयंत जय पांडा एक धक्कादायक विधान करून पुरती खळबळ उडवून दिली आहे. बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींचे पाकिस्तान लष्कर आणि आयएसआय या पाकी गुप्तचर संस्थेसोबत कनेक्शन असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. हा आरोप सिद्ध करणारा मोठा पुरावा आपल्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बैजयंत जय पांडा हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ता असल्याने त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ माजलीय.  जम्मू काश्मिरात हिंसक कारवायांसाठी जबाबदार आणि त्याला प्रोत्साहन देणा-या असलेल्या काही पाकिस्तानी व एनआरआयसोबत बॉलिवूडच्या काही बड्या लोकांचे कनेक्शन आहे, असा दावा करणारे ट्विट पांडा यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र  देशभक्ती बाळगणा-या बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी अशांना घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन त्यांनी केला.   


 पांडांच्या या ट्विटवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून चौकशीची मागणी केली आहे तर काहींनी बॉलिवूडमधील अशा लोकांची नावे उघड करा, अशी मागणी पुढे रेटली आहे. पुरावा असेल तर या प्रकरणाची एनआयए चौकशी का करत नाही? असा सवालही काही लोकांनी त्यांना केला आहे.
 याआधी भाजपाचे दिग्गज नेते बीएल संतोष यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

Web Title: Baijayant Jay Panda Claims Some Bollywood Celebs Have Verifiable Links to ISI and Pak Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.