"१५० च्या पेरूसाठी मी २०० रुपये देताच त्या महिलेने..."; मायदेशी येताच प्रियंका चोप्राने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:24 IST2025-03-20T12:24:19+5:302025-03-20T12:24:42+5:30

प्रियंका चोप्रा सध्या भारतात आगामी सिनेमाचं शूटिंग करायला आली आहे. त्यावेळी तिला आलेला खास अनुभव तिने सर्वांना सांगितला आहे (priyanka chopra)

bajirao mastani actress Priyanka Chopra share guava seller inspiring story | "१५० च्या पेरूसाठी मी २०० रुपये देताच त्या महिलेने..."; मायदेशी येताच प्रियंका चोप्राने सांगितला अनुभव

"१५० च्या पेरूसाठी मी २०० रुपये देताच त्या महिलेने..."; मायदेशी येताच प्रियंका चोप्राने सांगितला अनुभव

प्रियंका चोप्रा (priyanka chopra) ही जगात नाव गाजवणारी अभिनेत्री. बॉलिवूडमधून अभिनयाची सुरुवात करणारी प्रियंका पुढे आंतरराष्ट्रीय गायिका बनली. इतकंच नव्हे हॉलिवूडच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये तिने काम केलं. आता प्रियंका चोप्रा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय सिनेमात झळकणार आहे. 'बाहुबली' फेम राजामौलींच्या आगामी सिनेमात प्रियंका दिसणार आहे. त्यानिमित्त प्रियंका भारतात आली असता तिला एक खास अनुभव आला.

प्रियंकाला आला फळविक्रेत्या महिलेचा खास अनुभव

प्रियंकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती सांगते की, "मला आज एका घटनेने खूप प्रेरणा मिळाली. मुंबईला जाण्यासाठी विशाखापट्टणम एअरपोर्टला मी जात होते. तेव्हा मी एका महिलेला पेरू विकताना बघितले. मला कच्चे पेरू खूप आवडतात त्यामुळे मी गाडी थांबवून त्या पेरूची किंमत त्या महिलेला विचारली. तिने १५० रुपये सांगितलं. मी २०० रुपये तिला दिले." 




"मी २०० रुपये दिल्यावर उरलेले ५० रुपये ती महिला मला द्यायला लागली. मी म्हटलं राहूदे. फक्त पेरू विकून ती महिला स्वतःचा उदरनिर्वाह करतेय याची मला जाणीव होती. परंतु काही वेळाने सिग्रन ग्रीन होण्याच्या आत त्या महिलेने मला आणखी दोन पेरू दिले. ती एक वर्किंग वूमन होती. तिला दान नको होतं. या गोष्टीने मला खूप प्रेरणा मिळाली." अशाप्रकारे प्रियंकाने तिला आलेला अनुभव शेअर केला. प्रियंका सध्या SSMB29 या तेलुगु सिनेमाच्या शूटिंगसाठी भारतात आली आहे. 

Web Title: bajirao mastani actress Priyanka Chopra share guava seller inspiring story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.