लहान आहेस लहानच रहा; नसत्या फंदात पडू नकोस...; ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 17:12 IST2021-06-27T17:10:40+5:302021-06-27T17:12:51+5:30
Harshaali Malhotra Video : हर्षालीचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. पण अलीकडे तिचा एक व्हिडीओ पाहिला आणि अनेकांनी हर्षालीला ट्रोल करणे सुरू केले.

लहान आहेस लहानच रहा; नसत्या फंदात पडू नकोस...; ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ झाली ट्रोल
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा. मुन्नीची भूमिका साकारली होती हर्षाली मल्होत्राने (Harshaali Malhotra). सिनेमात तिच्या वाट्याला एकही डायलॉग नसला तरी तिचा रुपेरी पडद्यावरील अंदाज पाहून सा-यांनीच तिचे कौतुक केले होते. हा सिनेमा केला तेव्हा मुन्नी फक्त सात वर्षांची होती. आता ती मोठी होतेय त्याच बरोबर ती ग्लॅमरसही दिसू लागली आहे.
हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ व फोटो ती शेअर करत असते. खरे तर हर्षालीचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. पण अलीकडे तिचा एक व्हिडीओ पाहिला आणि लोक बिथरले. अनेकांनी हर्षालीला ट्रोल करणे सुरू केले. (Harshaali Malhotra Video)
या व्हिडीओत हर्षाली तिच्या काल्पनिक बॉयफ्रेन्डसोबत बोलताना दिसतेय. काही लोकांना हा व्हिडीओ आवडला. पण अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हर्षालीला तिच्या वयाची आठवण करून दिली.
‘तुझे वय काय आहे?, असा सवाल एका युजरने हा व्हिडीओ पाहून केला. अन्य एकाने अभ्यासात लक्ष घाल, इतक्या लवकरच बॉयफ्रेन्डच्या नादाला लागू नकोस, असा सल्ला दिला.
अशा पद्धतीने ट्रोल होऊ लागताच हर्षालीने ट्रोलर्सला उत्तरही दिले. अरे, तुम्ही फार सीरिअसली घेतले. हा व्हिडीओ केवळ मज्जा म्हणून केला, असे ती म्हणाली.
बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हषार्लीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.
सिनेमात काम करण्यासाठी हर्षार्ली मल्होत्राने दोन-तीन लाख रुपये घेतले. सुरूवातीला ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हषार्ली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची.
इतकेच नाही तर सलमान खानसोबत (Salman Khan) बोलतानाही ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली होती. ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा करण्याआधी हर्षालीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.