बजरंगी भाईजानमधील मुन्नी झाली 13 वर्षांची, दिसते खूपच सुंदर, पाहा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:56 IST2021-06-04T18:52:48+5:302021-06-04T18:56:26+5:30
हर्षाली आज 13 वर्षांची झाली असून तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बजरंगी भाईजानमधील मुन्नी झाली 13 वर्षांची, दिसते खूपच सुंदर, पाहा फोटो
सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात फक्त सलमानचीच नाही तर मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीचीदेखील खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेनं रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता.
या चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्यावेळी हर्षाली अवघी सात वर्षांची होती. हर्षाली आज 13 वर्षांची झाली असून तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हर्षाली चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
सलमान खानची मुन्नी आता खूप स्टाइलिश झाली आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बजरंगी भाईजान चित्रपटाआधी तिने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकेत 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि सावधान इंडियाचा समावेश आहे.
बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेतून हर्षाली खूप लोकप्रिय झाली. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 'बजरंगी भाईजान'च्या सेटवर हर्षाली रिकाम्या वेळेत सलमान खान आणि कबीर खानसोबत खेळायची. चित्रपटात जेव्हा ती सलमानला फायटिंग किंवा इमोशनल सीन करताना पहायची तेव्हा तिला रडू कोसळायचे. मग सलमान तिची समजूत काढायचा. जेव्हा हर्षालीला कोणता सीन समजला नाही तर ती कबीर खानकडे जायची आणि सीन समजून घ्यायची.