'बाला परत आला..', अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चा ट्रेलर पाहून नेटकरी सुसाट; भन्नाट मीम्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:48 PM2022-05-09T19:48:20+5:302022-05-09T21:12:50+5:30
Prithviraj Trailer: पृथ्वीराजचा ट्रेलर रिलीज होताच लोकांनी त्यावर मीम्स बनवण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर काहीजण त्याच्या अॅक्शन सीनची खिल्ली उडवत आहेत तर काहीजण त्याच्या एक्सप्रेशनची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
अक्षय कुमार(Akshay Kumar)चा बहुप्रतिक्षित 'पृथ्वीराज' (Prithviraj Movie) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर रिलीज होताच लोकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सोनू सूद आणि मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सोनू सूद चंदरवरदाईच्या भूमिकेत आहे. मानुषी छिल्लर(Manushi Chhillar)चा हा डेब्यू चित्रपट असून ती संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत असले तरी, ट्रेलरमधील अक्षयचे एक्सप्रेशन आणि त्याची अॅक्शन लोकांना फारशी भावली नसल्याचे दिसते.
पृथ्वीराजचा ट्रेलर रिलीज होताच लोकांनी त्यावर मीम्स बनवण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर काहीजण त्याच्या अॅक्शन सीनची खिल्ली उडवत आहेत तर काहीजण त्याच्या एक्सप्रेशनची खिल्ली उडवत आहेत. चित्रपटाशी संबंधित विविध प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Serious role mai bhi jo hasa de wo @akshaykumar#PrithvirajTeaser is not up to the mark feels like maharaja Bala from housefull 4 is back again #YRF50pic.twitter.com/RHd2lyCy9d
— BeingChinu 1 (@BeingChinu1) November 15, 2021
काही लोक अभिनेत्याला वाईटरित्या ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत की अक्षयच्या जागी रणवीर सिंगला घेतले असते तर बरे झाले असते. त्याचवेळी काही लोक अक्षय कुमारच्या पृथ्वीराजची तुलना हाऊसफुल्लच्या बालासोबत करत आहेत.
Same energy #PrithvirajTeaserpic.twitter.com/LBI4EdLbc5
— Detective (@cheeks4042) November 15, 2021
'पृथ्वीराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, "शौर्य आणि पराक्रमाची अमर कहाणी... ही कथा आहे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची. हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. पृथ्वीराजच्या सिनेमागृहांमध्ये ३ जानेवारी रोजी. आनंद घ्या".