पाकिस्तानात ‘रईस’वर बॅन; माहिराचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 12:33 PM2017-02-07T12:33:28+5:302017-02-07T18:03:28+5:30

बॉलिवूडच्या पहिल्या-वहिल्या ‘रईस’ या सिनेमात शाहरूख खानसोबत झळकलेली पाक अभिनेत्री माहिरा खान ही गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये ‘रईस’ रिलिज ...

Ban on 'Rais' in Pakistan; The dream of Maharishi broke | पाकिस्तानात ‘रईस’वर बॅन; माहिराचे स्वप्न भंगले

पाकिस्तानात ‘रईस’वर बॅन; माहिराचे स्वप्न भंगले

googlenewsNext
लिवूडच्या पहिल्या-वहिल्या ‘रईस’ या सिनेमात शाहरूख खानसोबत झळकलेली पाक अभिनेत्री माहिरा खान ही गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये ‘रईस’ रिलिज होण्याच्या प्रतीक्षेत होती. परंतु आता तिचे हे स्वप्न पूर्णत: भंगले आहे. कारण ‘रईस’ पाकिस्तानमध्ये रिलिज होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आहे. 

‘काबिल’नंतर ‘रईस’ पाकमध्ये रिलिज होणार असल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे भारतात रईसच्या सक्सेसचे सेलिब्रेशन करता आले नसल्याने पाकिस्तानमध्ये हा सिनेमा रिलिज व्हावा, अशी अपेक्षा माहिरा खान हिला होती. तिने याविषयी नुकतेच वक्तव्यही केले होते की, पाकिस्तानातील प्रेक्षक रईसच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सिनेमात मुस्लीम समाजाविरुद्ध अनुचित चित्रण केले गेल्याने सोमवारी या सिनेमावर पाकिस्तानात प्रतिबंध लावण्यात आला आहे. 



‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने याविषयीचा निर्णय घेतल्याने रईस पाकमध्ये रिलिज होणार नसल्याने माहिरा खानचे एकप्रकारे स्वप्नच भंगले आहे. पाक सेन्सॉर बोर्डाने सिनेमावर बॅन लावताना म्हटले की, सिनेमात मुस्लीम या संप्रदायाला चुकीचे पद्धतीने दाखविण्यात आले आहे. मुस्लीम धर्माची छबी खराब करण्याचा एकप्रकारचा प्रयत्नच सिनेमात करण्यात आला आहे. तसेच मुस्लीम बांधवांना दहशतवाद्यांच्या रुपात दाखविण्यात आल्या कारणाने हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित केला जाणार नसल्याचे म्हटले. तसेच भारत-पाकमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांमुळेही या सिनेमावर पाकिस्तानात प्रतिबंध आणल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाक सातत्याने कुरापती काढत असल्याने त्याचा परिणाम भारत-पाक संबंधांवर होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय सैन्याने चोख उत्तर दिल्यानेही पाकिस्तानाची त्रेधातिरपट उडाली आहे. मात्र पाकच्या कुरापती सुरूच असल्याने भारताकडून काही कठोर निर्णय घेतले गेले असून, पाक कलाकारांना भारतात प्रतिबंध करण्यात आले आहे. यामुळे पाक अभिनेत्री माहिरा खान हिला रईसच्या प्रमोशनसाठी भारतात येणे शक्य नसल्याने ती पाकिस्तानमध्ये रईसच्या रिलिजच्या प्रतीक्षेत होती. 

गेल्या आठवड्यातच रईससोबत रिलिज झालेल्या काबिलला पाकिस्तानात ग्रीन सिग्नल मिळाला होता. त्यामुळे रईसच्या रिलिजबाबतही उत्सुकता लागली होती. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकत्याच आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे माहिरा खान हिने रईस पाकिस्तानात रिलिज होणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर पाकमध्ये रईस चांगली कमाई करणार असल्याचेही भाकीत केले होते. त्यामुळे रईस पाकिस्तानमध्ये रिलिज होणार की नाही, यावरून बरीचशी चर्चाही रंगली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  

Web Title: Ban on 'Rais' in Pakistan; The dream of Maharishi broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.