बॅण्ड बाजा बारात ! अली फजल आणि रिचा चड्ढाचा समोर आला वेडिंग प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:32 AM2020-02-28T11:32:55+5:302020-02-28T11:33:17+5:30

अली फजल आणि रिचा चड्ढाचे लग्न दिल्लीत नाही तर होणार या ठिकाणी आणि या पद्धतीने

Band Baja Barat! Ali Fazal and Richa Chadha register themselves for wedding | बॅण्ड बाजा बारात ! अली फजल आणि रिचा चड्ढाचा समोर आला वेडिंग प्लान

बॅण्ड बाजा बारात ! अली फजल आणि रिचा चड्ढाचा समोर आला वेडिंग प्लान

googlenewsNext

फुकरे आणि फुकरे रिटर्न्समध्ये अली फजल व रिचा चड्ढा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. हे खऱ्या आयुष्यातही ते दोघे रिलेशनशीपमध्ये असून त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येते. तसेच ते दोघे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. आता ते दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे. ते दोघे कोर्ट मॅरिज करणार असल्याचे समोर आले आहे.

अली फजल व रिचा चड्ढा यांच्या लग्नाबद्दल मिड डेने कन्फर्म वृत्त दिले आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार नुकतेच रिचा चड्ढा व अली फजल यांनी बांद्रा फॅमिली कोर्टात जाऊन लग्नासाठी अर्ज केला आहे.

सूत्रांनी मिड डेला दिलेल्या माहितीनुसार, अली फजल व रिचा चड्ढाने १५ फेब्रुवारीला लग्नाचा अर्ज सबमिट केला आहे. मॅरिज रजिस्ट्रेशनच्या नियमानुसार, त्यांना लग्नासाठी १५ मार्चची तारीख मिळेल. पण, त्यादरम्यान अली व रिचाचे शूट आहे आणि ते दोघे ३१ मार्चपर्यंत त्यांची कामे संपवून एप्रिल महिन्यात लग्नबेडीत अडकतील. ते एप्रिल महिन्याच्या मध्यात लग्न करतील. त्याप्रमाणे मुंबईत ते कोर्ट मॅरिज करतील.


रिचा चड्ढा व अली फजल यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, आता फक्त लग्नासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रोसेसनंतर अर्ज दाखल केल्यानंतर तीन महिन्यापर्यंत या अर्जाची वैधता असते. ते दोघे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अधिकृतरित्या लग्न करतील. त्यानंतर सेलिब्रेशन्स होईल. 


रिचा व अली लवकरच लग्नाबद्दल त्यांच्या चाहत्यांना सांगतील.

Web Title: Band Baja Barat! Ali Fazal and Richa Chadha register themselves for wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.