'ऑक्टोबर' सिनेमात वरुण धवनसोबत झळकलेली बनिता संधू आहे बॉलिवूडपासून दूर, कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 03:03 PM2023-05-06T15:03:33+5:302023-05-06T15:04:17+5:30
Banita Sandhu : २०१८ साली रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या चित्रपटातून अभिनेत्री बनिता संधूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
२०१८ साली रिलीज झालेल्या ऑक्टोबर (October) चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या चित्रपटातून अभिनेत्री बनिता संधू(Banita Sandhu)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तिला दिग्दर्शक शुजित सरकार आणि वरुण धवनसारख्या मोठ्या स्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बनिताने साऊथमधील चित्रपटात आणि काही ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले. मात्र, तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले नाही. नुकतेच तिने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला.
अभिनेत्री बनिता संधू हिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडपासून दूर राहण्यामागचे कारण सांगितले आहे. बनिता ही कमल मुसळे दिग्दर्शित ‘मदर तेरेसा आणि मी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बनिता यामध्ये कविता नावाचे महत्त्वाचे पात्र साकारणार आहे. त्यामुळे ती सध्या या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याचे तिने सांगितले.
‘मदर तेरेसा आणि मी’ या चित्रपटातील ‘कविता’ पात्राच्या भूमिकेबद्दल बनिता संधू म्हणाली, मी या पात्राशी संपूर्णपणे रिलेट करते. कविता ही तरूण मुलगी असून ती स्वत:च्या आयुष्यात खूप हरवलेली आहे. तिला आयुष्यात नेमके काय हवे आहे हे तिला समजत नाही. या समस्येला तोंड देण्याऐवजी ती भारतातून पळून जाण्याचा निर्णय घेते. आजची तरुण पिढी या घटनेला पूर्ण रिलेट करू शकते. या कविता नामक पात्राची मला एक गोष्ट फार आवडते ती म्हणजे, मदर तेरेसांच्या माध्यमातून तिने तिचे चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि स्वतःशी असलेले नाते विकसित केले, हे पात्र माझ्यासारखेच आहे.
बनिता संधूचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला असून वयाच्या ११ व्या वर्षापासून अभिनय करते. लंडनमध्ये राहिल्यामुळे तिला सुरूवातीला हिंदी बोलण्यातही असंख्य अडचणी येत होत्या यासाठी तिने हिंदीचे क्लासही लावले होते.