‘बॅँक चोर’ रितेश देशमुखने घेतली पीएनबी महाघोटाळ्याचा सुत्रधार नीरव मोदीची फिरकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:32 PM2018-02-20T15:32:43+5:302018-02-21T13:52:49+5:30

सध्या संपूर्ण देशभरात डायमंड व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅँकेत केलेल्या ११,५०० कोटी रूपयांच्या महाघोटाळ्याचीच चर्चा रंगत आहे. ...

Bank Chor 'Riteish Deshmukh has taken a plunge of PNB mahoghota; | ‘बॅँक चोर’ रितेश देशमुखने घेतली पीएनबी महाघोटाळ्याचा सुत्रधार नीरव मोदीची फिरकी!

‘बॅँक चोर’ रितेश देशमुखने घेतली पीएनबी महाघोटाळ्याचा सुत्रधार नीरव मोदीची फिरकी!

googlenewsNext
्या संपूर्ण देशभरात डायमंड व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅँकेत केलेल्या ११,५०० कोटी रूपयांच्या महाघोटाळ्याचीच चर्चा रंगत आहे. यास बॉलिवूडदेखील अपवाद नाही. नुकतेच अभिनेता रितेश देशमुख याने नीरव मोदीची फिरकी घेताना एक ट्विट केले. याअगोदर अभिनेते ऋषी कपूर यांनीही ट्विट करून एवढा मोठा महाघोटाळा होतोच कसा? असा प्रश्न उपस्थित केला होता. आता रितेशच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नीरव मोदी प्रकरण चर्चिले जात आहे. 

रितेशने त्याच्या ‘बॅँक चोर’ या चित्रपटाचा एक फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी एकटाच असा ‘बॅँक चोर’ आहे जो अपयशी ठरला आहे.’ तुमच्या माहितीकरिता रितेशचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. हा चित्रपट बनविण्यासाठी तब्बल १५ कोटी रूपये खर्च आला होता. मात्र चित्रपटाने केवळ आठ कोटी रूपयांचाच बिझनेस केला होता. चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत होता. 
 }}}} ">I am the only ‘BANK-CHOR’ that failed. pic.twitter.com/E10PzOXe9i— Riteish Deshmukh (@Riteishd) February 20, 2018
दरम्यान, रितेशच्या या ट्विटला हजारो यूजर्सकडून लाइक आणि रिट्विट केले जात आहे. काहींनी तर यास गमतीशीर कॉमेण्टही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ज्या पद्धतीने घोटाळ्याचे आकडे समोर येत आहेत. त्यावरून मला भीती वाटत आहे की, पंतप्रधानांनी उलट आम्हालाच १५ लाख रूपये मागण्यास सुरू करू नये. दरम्यान, या अगोदर ऋषी कपूर यांनी ट्विट करताना लिहिले होते की, ‘मला हे कळत नाही की, २०११ मध्ये बॅँक ११,३०० कोटी रूपयांचे कर्ज देते अन् त्यानंतर आता त्याची चौकशी केली जाते? यावरून हे स्पष्ट होते की, जे काही चमकत आहे ते नक्कीच डायमंड नाही.’

Web Title: Bank Chor 'Riteish Deshmukh has taken a plunge of PNB mahoghota;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.