पाक स्टार्सवरील बॅन; सिनेमांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2016 12:45 PM2016-10-04T12:45:25+5:302016-10-05T10:36:57+5:30

भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलाकरांवर बॅन लावल्याने काही बॉलिवूडपटांचे प्रोजेक्ट सुरू होण्याअगोदरच ...

Bans on Pak Stars; Film losses | पाक स्टार्सवरील बॅन; सिनेमांचे नुकसान

पाक स्टार्सवरील बॅन; सिनेमांचे नुकसान

googlenewsNext
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलाकरांवर बॅन लावल्याने काही बॉलिवूडपटांचे प्रोजेक्ट सुरू होण्याअगोदरच बंद पडणे जवळपास निश्चित आहे. आंतकवाद्यांना थारा देणाºया पाकिस्तानच्या कलाकारांना देखील भारतीय भूमित काम देवू नये या इम्पाच्या भूमिकेमुळे पाक स्टार्सना भारत सोडून परतावे लागले. त्यातच मनसे, शिवसेना या पाक कलाकारांना ४८ तासांचा अल्टीमेटम दिल्याने पाक स्टार्सना भारत सोडून पाकिस्तानात जावे लागले. मात्र यामुळे काही चित्रपट व म्युझिक प्रोजेक्ट डब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 



पाक स्टार्सचेही नुकसान
फवाद खान, माहिरा खान आणि अभिनेता-गायक अली जफर या मोठ्या स्टार्सलाही इम्पाच्या या निर्णयाचा फटका बसला आहे. हे तिन्ही स्टार्सनी मोठ्या बॅनर्सचे प्रोजेक्ट साईन केले होते. खरं तर चित्रपट इंडस्ट्रीपेक्षा म्युझिक इंडस्ट्रीवर याचा अधिक परिणाम होणार आहे. राहत फतेह अली खान, अली जफर आणि आतिफ अस्लम हे म्युझिक स्टार्स मोठ्या म्युझिक अल्बममध्ये काम करणार होते. 


या चित्रपटांवर होणार परिणाम
गौरी शिंदे यांच्या ‘डियर जिंदगी’ या चित्रपटाला पाक स्टार्सच्या बॅनचा फटका बसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात आलिया भट्ट लीड रोलमध्ये असून, अली जफर तिचा को-अ‍ॅक्टर्स आहे. माहिरा खान ‘रईस’नंतर एक चित्रपट साइन केला होता. परंतु या निर्णयामुळे तिला त्या प्रोजेक्टमध्ये काम करता येणार नाही. फवाद देखील सलमानच्या आगामी चित्रपटात काम करणार होता. मात्र आता तयला काम करता येणार नाही. 


म्युझिक इंडस्ट्रीवर परिणाम
नुकताच बंगळुरू आणि गुडगांव येथे पाकिस्तानी गायक शफकत अमानत अली आणि आतिफ असलम हे कॉन्सर्ट करणार होते. परंतु इम्पाच्या निर्णयामुळे ही कॉन्सर्ट रद्द करावी लागली. टीपी अग्रवाल यांनी देखील त्यांच्या आगामी ‘लाली की शादी मे लड्डू दीवाना’ या चित्रपटात राहतच्या जागेवर दूसºया गायकाला संधी दिली आहे. 

टेक्नीशियनवरही बॅन
बॉलिवूडमध्ये केवळ पाकिस्तानी कलाकारच नव्हे तर बरेचसे टेक्नीशियन देखील काम करीत आहेत. इम्पाच्या या निर्णयामुळे त्यांना देखील भारताबाहेर पडावे लागले. त्यामुळे टेक्नीशियन या कॅटगिरीत देखील चित्रपट निर्मात्यांना नवीन टेक्नीशियन भरण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. 

Web Title: Bans on Pak Stars; Film losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.