Bappi Lahiri Birthday: ‘गोल्डन किंग’ बप्पी दा का घालतात इतकं सोनं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:15 PM2019-11-27T12:15:08+5:302019-11-27T12:16:07+5:30

Bappi Lahiri Birthday: बप्पी दा यांचा आज वाढदिवस.

bappi lahiri birthday special reason behind wearing gold | Bappi Lahiri Birthday: ‘गोल्डन किंग’ बप्पी दा का घालतात इतकं सोनं?

Bappi Lahiri Birthday: ‘गोल्डन किंग’ बप्पी दा का घालतात इतकं सोनं?

googlenewsNext
ठळक मुद्देसोन्यासह त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चांदीही आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेंड सेटर आहेत. यातलेच एक नाव म्हणजे, बप्पी दा अर्थात बप्पी लहिरी. सुरुवातीच्या काळात बप्पीदांचे संगीत अनेकांना आवडले नाही. पण काळासोबत त्यांच्या गाण्यांनी असा काही धुमाकूळ घातला की, सगळेच त्यांच्या प्रेमात पडले. त्यांच्या गाण्यातील वेगळेपण आणि अंगावरचे सोने यामुळे बप्पी दा नावाचा हा माणूस सगळ्यांपासून वेगळा ठरला. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आज बप्पी दा यांचा वाढदिवस.

 27 नोव्हेंबर 1952मध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला.  1973मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून करियरची सुरुवात केली. पण 1976 साली प्रदर्शित ‘चलते-चलते’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली. या चित्रपटातील गाणी तुफान गाजली. यानंतर 1982 साली आलेल्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने बप्पी दा यशोशिखरावर पोहोचले.

बप्पी दा इतके सोने का घालतात? हा प्रश्न आजही अनेक चाहत्यांना पडतो.  एका मुलाखतीत बप्पी दा यांनी याचे उत्तर दिले होते. त्यांनी सांगितले होते की, ‘हॉलिवूडमध्ये एलविस प्रेस्ली सोन्याची चैन घालत असत. एलविस माझे अतिशय आवडते होते. जीवनात यशस्वी झालो तर मी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करेल, हे मी आधीच ठरवले होते.   देवाची कृपा आहे की मी इतके सोने घालून मिरवू घालू शकलो. सोनं माझ्यासाठी लकी आहे.’  


 
बप्पी दा यांच्याकडे 754 ग्रॅम सोने आहे. पण त्यांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षाही अधिक सोने आहे. होय, त्यांच्या पत्नीकडे 967 ग्रॅम सोने आहे.

केवळ सोने नाही तर बप्पी दा यांच्याकडे 4.62 किलो चांदी आहे. त्यांच्या पत्नीकडे 8.9 किलो चांदी आहे. बप्पी दा यांना गळ्यात लॉकेट घालणे आवडते. याशिवाय त्यांच्याकडे अनेक आकर्षक सोनसाखळ्या व ब्रेस्लेट आहेत.
 

Web Title: bappi lahiri birthday special reason behind wearing gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.