'आपण अनमोल रत्न गमावलं'; बप्पी लहरींच्या निधनामुळे बॉलिवूडकरांवर कोसळाला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:22 AM2022-02-16T11:22:44+5:302022-02-16T11:23:49+5:30

Bollywood celebs: बप्पी लहरी यांचं निधन झाल्याचं समजताच कलाविश्वातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अक्षय कुमारपासून रविना टंडनपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

bappi lahiri death ajay devgn akshay kumar and other bollywood celebs mourn with emotional tweets | 'आपण अनमोल रत्न गमावलं'; बप्पी लहरींच्या निधनामुळे बॉलिवूडकरांवर कोसळाला दु:खाचा डोंगर

'आपण अनमोल रत्न गमावलं'; बप्पी लहरींच्या निधनामुळे बॉलिवूडकरांवर कोसळाला दु:खाचा डोंगर

googlenewsNext

बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी निधन झालं. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७० च्या काळात बॉलिवूडला डिस्को आणि रॉक म्युझिकची ओळख करुन देणाऱ्या बप्पी लहरींचं निधन झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहत आहेत. 

बप्पी लहरी यांचं निधन झाल्याचं समजताच कलाविश्वातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अक्षय कुमारपासून रविना टंडनपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

"बप्पी दा व्यक्तीगतरित्या खरंच खूप प्रेमळ होते. त्यांच्या संगीताला एक धार होती. त्यांनी सहस सुंदरपणे हिंदी कलाविश्वाला आपल्या कंटेंपररी स्टाइलची ओळख करुन दिली. बप्पी दा तुम्ही कायम स्मरणात रहाल", अशी पोस्ट शेअर करत अजय देवगणने त्यांना आदरांजली वाहिली आहे.

तर, "आज आपण संगीत क्षेत्रातील एक अनमोल रत्नाला गमावलं आहे. बप्पी दा तुमच्या आवाजावर माझ्यासह लाखो लोक थिरकले आहेत. तुम्ही संगीताच्या माध्यमातून आनंद लुटला आहे. ते सगळे आनंदाचे क्षण देण्यासाठी मनापासून आभार", असं अक्षय कुमार म्हणाला.

दरम्यान, अजय , अक्षयप्रमाणेच रविना टंडन, अनुपम खेर, मिथून चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
 

Web Title: bappi lahiri death ajay devgn akshay kumar and other bollywood celebs mourn with emotional tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.