Bappi Lahiri : म्हणून कायम सोन्याचे दागिने घायालचे बप्पी लहरी, जाणून घ्या यामागाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:21 AM2022-02-16T09:21:45+5:302022-02-16T09:39:43+5:30

Bappi Lahiri Death: बॉलिवूडचे जेष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी(Bappi Lahiri) यांचे निधन झाले.

Bappi lahiri death interesting facts why he wore so much gold | Bappi Lahiri : म्हणून कायम सोन्याचे दागिने घायालचे बप्पी लहरी, जाणून घ्या यामागाचे कारण

Bappi Lahiri : म्हणून कायम सोन्याचे दागिने घायालचे बप्पी लहरी, जाणून घ्या यामागाचे कारण

googlenewsNext

Bappi Lahiri Death: बॉलिवूडचे जेष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी(Bappi Lahiri) यांचे निधन झाले. बप्पी दा यांनी जवळपास 48 वर्षे आपल्या गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केले. जवळपास 500 चित्रपटांमध्ये त्यांनी 5000 हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आणि गायली. बप्पी दा त्याच्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असायचे. त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड होती. एका मुलाखतीत त्याने यामागचे कारणही सांगितले.

बप्पी दा म्हणाले होते की, ते अमेरिकन स्टार एल्विस प्रेस्लीचा खूप मोठे चाहते होते. त्यांनी एल्विसला प्रत्येक परफॉर्मन्समध्ये सोन्याची चेन घातलेला पाहिले होते. तेव्हा बप्पी दा त्यांच्या संघर्षाच्या टप्प्यात होते आणि त्यांनी निश्चय केला होता की ते यशस्वी झाल्यावर खूप सोनं घालणार आहेत. ज्यावेळी ते यशस्वी झाला तेव्हा त्यांनी इतकं सोनं अंगावर घातलं की त्यांची ओळख भारताचा गोल्ड मॅन म्हणून झाली. 

बप्पी दा यांच्या म्हणण्यानुसार, सोनं त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरले, म्हणून त्यांनी ते घालणे कधीच सोडले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बप्पी दा यांच्याकडे सुमारे 50 लाखांचे सोने होते. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 20 कोटी रुपये आहे.

बप्पी दांप्रमाणेच त्यांची पत्नी चित्रानी यांनाही सोनं आणि हिऱ्यांची आवड आहे. 2014 मध्ये, त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे बप्पी दापेक्षा जास्त 967 ग्रॅम सोने, 8.9 किलो चांदी आणि 4 लाख रुपये जास्त किंमतीचे हिरे आहेत.


 

Web Title: Bappi lahiri death interesting facts why he wore so much gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.