राधिका आपटेसोबत या अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झालेत लीक, व्हिडिओंनी माजवली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 19:29 IST2020-05-27T19:27:44+5:302020-05-27T19:29:19+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे एमएमएस लीक झाल्यामुळे सहन करावा लागला होता मनस्ताप

राधिका आपटेसोबत या अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झालेत लीक, व्हिडिओंनी माजवली होती खळबळ
लॉकडाउनमध्ये सामान्यांसोबत सर्व कलाकार आपापल्या घरात कैद आहेत आणि आपल्या घरांतल्यासोबत वेळ व्यतित करत आहेत. यादरम्यान शूटिंग बंद असल्यामुळे कलाकार सोशल मीडियावर एक्टिव्ह झाले आहेत. यादरम्यान ते त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच आपल्या चाहत्यांशी लाइव्ह गप्पादेखील मारताना दिसत आहेत. मात्र कधी कधी त्यांना सोशल मीडियामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर काहींना सोशल मीडियामुळे वाईट परिणामही भोगावे लागले आहेत. काही अभिनेत्रीचे सोशल मीडियावर एमएमएस लीक झालेले आहेत.
2005 सालची घटना आहे एक एमएमएस सोशल मीडियावर लीक झाला होता आणि हा व्हिडिओ प्रीती झिंटाचा असल्याचे बोलले जात होते. या एमएमएसमध्ये ती आंघोळ करताना दिसत होती. असे म्हटले जाते की एका हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना तिथल्या एका स्टाफने हा क्लिप बनवला होता. अद्याप तो व्हिडिओ तिचाच होता का हे स्पष्ट झाले नाही. मात्र हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
कमल हसनची मुलगी आणि श्रुती हसनची बहिण अक्षरा हसनसोबतही 2018 साली असे घडले होते. तिचा खूप बोल्ड फोटो लीक झाला होता. त्याची तक्रार त्यांनी मुंबई पोलीस व सायबर सेलमध्ये केली होती.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेचा एक बोल्ड सेल्फी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल होत होता. हा फोटो तिचा होता की दुसऱ्या कोणाचा हे स्पष्ट झाले नाही.
बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या एमएमएसमधील काही फोटो लीक झाले होते. या फोटोत ती आंघोळ करताना दिसत होती. हा एमएमएस तिचाच होता का हे स्पष्ट झाले नाही.
अभिनेत्री मोना सिंगचादेखील एक बोल्ड व्हिडिओ लीक झाला होता. पण, यात तीच होती, हे सिद्ध झाले नाही.