​बत्रा साहेब पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हिंदी मीडियम’चा येणार सीक्वल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2017 09:42 AM2017-06-18T09:42:06+5:302017-06-18T15:12:06+5:30

इरफान खान स्टारर ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट रिलीज होऊन महिना होतोय. गत महिन्यात १९ तारखेला हा चित्रपट रिलीज झाला ...

Batra Saheb visits again to meet the audience; 'Hindi Medium' Sequel! | ​बत्रा साहेब पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हिंदी मीडियम’चा येणार सीक्वल!

​बत्रा साहेब पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हिंदी मीडियम’चा येणार सीक्वल!

googlenewsNext
फान खान स्टारर ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट रिलीज होऊन महिना होतोय. गत महिन्यात १९ तारखेला हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार प्रदर्शन केले. महिन्याभरात ६५.४६ कोटी रूपयांची कमाई केली. आता या चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. होय, या चित्रपटाचा सीक्वल येतोय. होय, ऐकता ते अगदी खरे आहे. साकेत चौधरी दिग्दर्शित ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा सीक्वल येणार, हे कन्फर्म झालेय. निर्माता दिनेश विजन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळाला, तो अद्भूत आहे. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या सीक्वलमध्येही इरफान खान आणि सबा कमर हीच जोडी दिसणार आहे. एकंदर काय तर, बत्रा साहेब(इरफानचे चित्रपटातील पात्र) पुन्हा आपल्या भेटीला येणार हेही कन्फर्म झालेय.
  दिल्लीत चांदनी चौक परिसरात लहानाचा मोठा झालेला, सरकारी शाळेत शिकलेला, टेलरकडे काम शिकत आज चांदनी चौकमध्ये साड्यांचे दुकान चालवणारा राज बत्रा (इरफान खान) आपल्या पत्नीचा मिताचा (सबा करीम) एकही शब्द खाली पडू देत नाही. मिताही त्याच्यासारखीच सरकारी शाळेत शिकली असली तरी तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे. राज तनाने आणि मनाने चांदनी चौकचा आहे. तर मिताला मात्र श्रीमंतीचे आकर्षण आहे. या जोडप्याची मुलगी पियाला दिल्लीतील टॉप इंग्रजी शाळेत शिकवण्याच्या मिताच्या महत्त्वाकांक्षेपोटी राजला चांदनी चौक सोडून उच्चभ्रू वस्तीत  वसंत विहारमध्ये यावे लागते. मात्र तरीही पियाच्या अ‍ॅडमिशनचा प्रश्न सुटत नाही.पियाला प्रवेश न मिळण्यामागे आधी तिच्या आई-वडिलांची  देहबोली, अर्धेकच्चे इंग्रजी कारणीभूत असते. इथे त्यांना यासंदर्भात सगळ्या प्रकारचे समुपदेशन करणाºया प्रशिक्षिकेची मदत मिळते. राज आणि मिता तथाकथित उच्चभ्रू पालकांसारखे बनण्यासाठी प्रशिक्षण घेतात, तयारीनिशी मुलाखतीही देतात पण तरीही पियाला त्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. अखेर पियाला आरटीआयअंतर्गत गरीब लोकांच्या कोट्यातून प्रवेश मिळावा म्हणून हे जोडपे महिनाभर गरीब वस्तीतही राहतात. राज-मिताचा वसंत विहारमधील अनुभव आणि गरीब म्हणून भारत नगरवस्तीतला अनुभव यादरम्यान खूप काही घडते. गरीब वस्तीत अनुभवाला आलेले आपलेपण, पियाला मिळालेले समृद्ध जीवन, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून शेजाºयाच्या मुलीला दाखल्यासाठी पैसे मिळवून देणारा मित्र या सगळ्या अनुभवातून राज-मिता बदलतात, असे याचे कथानक आहे.

Web Title: Batra Saheb visits again to meet the audience; 'Hindi Medium' Sequel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.