B'day Special : विमानतळावरील पहिल्याच भेटीत जेनेलिया डिसूझाने रितेश देशमुखला दाखविला अ‍ॅटीट्यूड!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 03:53 PM2017-12-17T15:53:48+5:302017-12-17T21:28:46+5:30

२००२ या सालातील कुठल्या तरी दिवसाचा हा किस्सा आहे. या दिवशी एक सोळा वर्षांची अतिशय सुंदर मुलगी हैदराबाद येथील ...

B'day Special: Genelia D'Souza showed Attitude to Riteish Deshmukh on his first visit to the airport! | B'day Special : विमानतळावरील पहिल्याच भेटीत जेनेलिया डिसूझाने रितेश देशमुखला दाखविला अ‍ॅटीट्यूड!

B'day Special : विमानतळावरील पहिल्याच भेटीत जेनेलिया डिसूझाने रितेश देशमुखला दाखविला अ‍ॅटीट्यूड!

googlenewsNext
०२ या सालातील कुठल्या तरी दिवसाचा हा किस्सा आहे. या दिवशी एक सोळा वर्षांची अतिशय सुंदर मुलगी हैदराबाद येथील विमानतळावर महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित घराण्यातील मुलाला भेटण्यासाठी पोहोचली होती. ही मुलगी म्हणजे जेनेलिया डिसूझा अन् मुलगा रितेश देशमुख होय. हे दोघे त्यांच्या पहिल्याच ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटासाठी एकत्र येणार होते. रितेशला सांगण्यात आले की, तुझी हिरोईन तुला हैदराबाद विमानतळावर भेटणार आहे. त्यानुसार रितेश तिला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचला. तर जेनेलियाला रितेश एका मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याची कल्पना असल्याने, तो काहीसा अ‍ॅटीट्यूड दाखविणारा असेल अशी तिची धारणा होती. त्यामुळे जेनेलियानेही रितेशच्या समोर अ‍ॅटीट्यूड दाखविण्यास सुरुवात केली. ही बाब बघून रितेश दंग झाला. रितेशने याचा फारसा विचार न करता तिच्याशी हात मिळविला. परंतु हात मिळविताना जेनेलिया त्याच्याकडे न बघता दुसरीकडेच बघत होती. 



जेनेलियाच्या या स्वभावामुळे रितेश बुचकळ्यात पडला. कारण दोघांची ही पहिलीच भेट होती. जेनेलिया ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या टेस्ट शूटसाठी आली होती. पुढे या दोघांच्या सेटवर जशा मुलाखती होत गेल्या, तशी त्यांच्यात जवळीकता वाढत गेली. दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले होते. मात्र जेनेलियाने जो विचार केला होता, त्याच्या अगदी विपरीत रितेशचा स्वभाव असल्याने ती दंग राहिली, शिवाय त्याला इम्प्रेसही झाली. रितेश केवळ जेनेलियासोबतच चांगला वागत होता असे नाही, तर शूटिंगदरम्यान तो तिच्या आई-वडिलांबरोबरही अतिशय मनमिळाऊपणे बोलत असे. 



त्यामुळे दोघांची मैत्री एवढी घट्ट झाली की, दोघे एकमेकांच्या कुठल्याही विषयावर एकत्र येत असत. बºयाचशा लोकांना माहिती नाही की, रितेश एक प्रोफेशनल आर्किटेक्ट असून, दोघांचा सेटवरील चर्चेचा मुद्दा हा आर्किटेक्चरच असायचा. हैदराबाद येथील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रितेश मुंबईत आला. मात्र मुंबईत त्याचे फारसे मन लागले नाही. तो जेनेलियाला सारखे मिस करीत असायचा. जेनेलियालादेखील रितेशपासून दूर जाणे शक्य नव्हते. तीदेखील त्याला सातत्याने मिस करायची. 



खरं तर या दोघांच्या आयुष्यात प्रेम असे काही धडकले होते की, एकमेकांना बघितले अन् प्रेमात पडले, असेच काहीसे झाले होते. कारण एकमेकांना समजून घेता-घेताच ते प्रेमात पडले होते. परंतु अशाही स्थितीत दोघांपैकी कोणीही प्रपोज केले नव्हते. त्यानंतर धाडस करून एकमेकांना प्रपोज केले. पुढे तब्बल नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. बॉलिवूडमधील ब्रेकअप्स आणि पॅचअप्सचे किस्से समोर येत असताना रितेश आणि जेनेलियाची प्रेमकथा अशी काही बहरली की, त्याचा अखेर लग्नात झाला. या दाम्पत्याला आता राहील आणि रियान नावाची दोन गोंडस मुले असून, त्यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात यंगेस्ट कपल म्हणून बघितले जाते. 

Web Title: B'day Special: Genelia D'Souza showed Attitude to Riteish Deshmukh on his first visit to the airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.