B'day Special : लहानपणी हकलत बोलायचा हृतिक रोशन; लग्नासाठी आले होते ३० हजार प्रस्ताव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 04:34 PM2018-01-09T16:34:19+5:302018-01-09T22:04:19+5:30

अभिनेता हृतिक रोशन ४४ वर्षांचा झाला आहे. १० जानेवारी १९७४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या हृतिकने मुख्य अभिनेता म्हणून ‘कहो ना ...

B'day Special: Hrithik Roshan to be relieved in his childhood; 30 thousand proposals came for marriage! | B'day Special : लहानपणी हकलत बोलायचा हृतिक रोशन; लग्नासाठी आले होते ३० हजार प्रस्ताव!

B'day Special : लहानपणी हकलत बोलायचा हृतिक रोशन; लग्नासाठी आले होते ३० हजार प्रस्ताव!

googlenewsNext
िनेता हृतिक रोशन ४४ वर्षांचा झाला आहे. १० जानेवारी १९७४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या हृतिकने मुख्य अभिनेता म्हणून ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. या अगोदर त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’ या चित्रपटात पहिल्यांदा त्याने बालकलाकार म्हणून काम केले. त्यावेळेस हृतिकचे वय केवळ सहा वर्ष होते. आतापर्यंत बºयाचशा सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करणारा व आपल्या डायलॉग्स डिलिव्हरीसाठी ओळखला जाणारा हृतिक लहानपणी हकलावून बोलायचा. मात्र त्याने त्याच्या या अडचणीवर मात करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता तर बॉलिवूडचा पहिला सुपरहीरो म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. 



रिपोर्ट्सनुसार सुजैन खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक सिंगल आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्याला लग्नासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३० हजार प्रस्ताव आले होते. त्याचा पहिला ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आल्यानंतर तरुणी त्याच्यावर अशरक्ष: फिदा झाल्या होत्या. २००० साली व्हॅलेंटाइनच्या दिवशी त्याच्या घरी कित्येक लग्नाचे प्रस्ताव आले होते. मात्र त्यावेळी त्याचे मन सुजैनमध्ये गुंतले होते. पुढे या दोघांनी लग्न केले. त्यांना दोन मुलेही आहेत. सध्या हृतिक-सुजैन हे विभक्त झाले असले तरी, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. 



दरम्यान, नेहमीच शांत दिसणारा हृतिक त्याचे पर्सनल स्क्रॅपबुक मेंटेन करतो. या स्क्रॅपबुकच्या माध्यमातून तो त्याच्या दररोजच्या जीवनात घडणाºया गोष्टी फोटोंच्या माध्यमातून मेंटेन ठेवतो. आज हृतिकला इंडस्ट्रीत एक उत्कृष्ट डान्सर म्हणूनही ओळखले जाते. मात्र वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्याला डान्स करणे खूप अवघड वाटायचे. पुढे त्याने मनक्यावर उपचार केल्यानंतर डान्समध्ये यश मिळविले. त्याचबरोबर हृतिक नेहमीच फिट राहण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यासाठी तो नियमित वर्कआउट करतो. 

Web Title: B'day Special: Hrithik Roshan to be relieved in his childhood; 30 thousand proposals came for marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.