कधी शाहरूखचा आवाज होते गायक अभिजीत, मग का त्याच्यासाठी गाणी गाणं सोडलं? जाणून घ्या कारण...
By अमित इंगोले | Published: October 30, 2020 10:52 AM2020-10-30T10:52:14+5:302020-10-30T10:57:08+5:30
अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरूख खानला सिनेमातील गाण्यासाठी एकसारखं बघण्यात आलं. अभिजीत शाहरूखचा आवाज होते. आणि त्यांची गाणी फॅन्स आवडतही होती.
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत यांच्या आवाजाची जादू आज भलेही फिल्मी पडद्यापासून दूर आहे. पण ते आजही म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात बहारदार गायकांपैकी एक आहेत. आता अभिजीत यांना त्यांच्या गायकीसाठी कमी आणि वादांसाठी जास्त ओळखले जाते. पण यात जराही दुमत नाही की, एकेकाळी अभिजीत एका सुपरस्टारचा आवाज होते. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊ त्यांचा एका खास किस्सा....
शाहरूख खानचा आवाज होते अभिजीत
आपल्या गायकीच्या करिअरबाबत अभिजीत यांचं मत आहे की, त्यांनी अभिनेत्याला आपला आवाज देऊन स्टार बनवलं. एक काळ असाही होता की, बॉलिवूड किंग शाहरूख खानचा आवाज अभिजीत भट्टाचार्य होते. शाहरूखच्या प्रत्येक सिनेमात अभिजीत गाणं गात होते आणि अभिनेत्याची भरभरून कौतुक होत होतं. पण गायकाच्या वाट्याला कौतुक न येणं नेहमीच इंडस्ट्रीची समस्या राहिली आहे. असंच काहीसं अभिजीतसोबत झालं. ज्यानंतर त्यांनी शाहरूख खानसाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला.
अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरूख खानला सिनेमातील गाण्यासाठी एकसारखं बघण्यात आलं. अभिजीत शाहरूखचा आवाज होते. आणि त्यांची गाणी फॅन्स आवडतही होती. अभिजीत यांच्यानुसार त्यांनी शाहरूख खानसाठी आवाज दिला तेव्हा तो एक रॉकस्टार होता. नंतर तो लुंगी डान्स करू लागला.
काय होतं शाहरूखसाठी गाणी न गाण्याचं कारण?
इंडिया टुडेच्या सफाईगिरी समित आणि अवॉर्ड २०१८ मध्ये अभिजीत भट्टाचार्य आले होते. या इव्हेंटला श्वेता सिंह मॉडरेट करत होती. यावेळी श्वेता सिंहने अभिजीत यांना विचारले की, तुम्ही शाहरूख खानसाठी गाणी गाणं का सोडलं? यावर अभिजीत म्हणाले होते की, 'मी माझ्या आवाजाने सुपरस्टार बनवले आहे. जोपर्यंत मी शाहरूख खानसाठी गात होतो तेव्हा तो रॉकस्टार होता. जेव्हा मी त्याच्यासाठी गाणं बंद केलं. तो लुंगी डान्सवर आला'.
अभिजीत म्हणाले होते की, 'मी छोट्याशा कारणासाठी शाहरूख खानसाठी गाणं सोडललं. 'मै हूं ना' सिनेमात त्यांनी सगळ्यांना दाखवलं होतं. स्पॉटबॉयपासून ते सगळ्यांना. पण गायकांनी कुणीच दाखवलं नाही. हेच ओम शांती ओम सिनेमावेळी झालं. स्टार्सने धूम ताना गाणं गायलं. त्या गाण्याला माझा आवाज होता. पण हे दाखवलं नाही. मला याचं वाईट वाटलं. मी त्यांना माझं नाव लिहिण्यासाठी का सांगू? समस्या ही नाही की, माझ्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता आहे. मग मी त्यांना काही का मागू?
त्यासोबतच अभिजीत भट्टाचार्य म्हणाले होते की, 'मी एकटा असा गायक आहे जो लग्नांमध्ये गात नाही. एक-दोनदा गायलो. पण तेथील वातावरण खूप खराब होतं. मी अशा ठिकाणी गातो जिथे माझा सन्मान होईल. अभिजीत म्हणाले की २५ वर्षांपासून रिअॅलिटी शो सुरू आहे. पण कोणताही सिंगर स्टार बनला आहे. जज खुलेआम अर्थ नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. सोबतच ते म्हणाले की, मी स्वत:ला नेहमी भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचा भाग मानलं आहे. बॉलिवूडचा नाही.