‘नोटबुक’ची अभिनेत्री प्रनूतन बहलचे हे सुंदर फोटो पाहून व्हाल खल्लास!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:00 AM2019-02-23T06:00:00+5:302019-02-23T06:00:02+5:30
सलमान खानने अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. आता सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, मोनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल.
सलमान खानने अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. आता सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, मोनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल.
प्रनूतन आणि जहीर यांच्या अभिनयाने सजलेला ‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट किती यश मिळवतो, ते वेळ आली की कळलेच. पण तूर्तास या चित्रपटातून डेब्यू करणारी प्रनूतन मात्र जाम चर्चेत आहे. होय, सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोर्इंगमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळतेय. प्रनूतन सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर प्रनूतन बॉलिवूडमध्ये बराच मोठा पल्ला गाठेल, असे वाटतेय.
प्रनूतन हिची एक वेगळी ओळख म्हणजे, ती दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आहे. साहजिकचं प्रनूतनकडून आत्तापासून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असणार आहे. याचे एक कारण म्हणजे, तिला आवडो, ना आवडो तिची आजी नूतनसोबत तुलना होणार आहे.
नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातचं नूतन असल्याने साहजिकचं तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा राहणार आहेत. याशिवाय सध्याची लोकप्रीय अभिनेत्री काजोलसोबतही अप्रत्यक्षपणे तिची तुलना होणार आहे.
आपण सगळेच जाणतो की, काजोलची आई तनुजा आणि नूतन दोघी बहीणी आहेत. या नात्याने काजोल आणि मोहनीश बहल मावस भाऊ-बहीण आहेत आणि याच नात्याने प्रनूतन काजोलची भाची आहे. या कसोटीवर प्रनूतन किती यशस्वी ठरते, ते बघूच.
२५ वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे. तिला नृत्याचीही आवड आहे.
मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधलं मैत्रीचे नाते बरेच जुने आहे. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासांरख्या चित्रपटात सलमान आणि मोहनीशने एकत्र काम केले आहे.
हम आपके है कौन, हम साथ साथ है या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.