तो फोन कॉल आला नसता तर या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे झाला असता अक्षय कुमारचा डेब्यू...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 01:52 PM2021-01-27T13:52:06+5:302021-01-27T13:53:01+5:30

होय,एक फोन कॉल आला आणि अक्षयने सिनेमा गमावला...

because of ajay devgn akshay kumar lost blockbuster film phool aur kaante | तो फोन कॉल आला नसता तर या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे झाला असता अक्षय कुमारचा डेब्यू...!

तो फोन कॉल आला नसता तर या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे झाला असता अक्षय कुमारचा डेब्यू...!

googlenewsNext
ठळक मुद्दे​​​​​​​1993 साली रिलीज झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमासाठीही अक्षयने ऑडिशन दिले होते. मात्र ऑडिशनमध्ये त्याला रिजेक्ट केले गेले व ही भूमिका दीपक तिजोरीला दिली गेली.

अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केलीत. 25 जानेवारी 1991 रोजी अक्षयने ‘सौगंध’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अर्थात अक्षयचा हा पहिला सिनेमा दणकून आपटला. पण याऊपर अक्षयने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अक्की बॉलिवूडचा सर्वात बिझी स्टार आहे.

एक गोष्ट कदाचित तुम्हाला माहित नसावी, अजय देवगणचा ब्लॉकबस्टर ‘फुल और कांटे’ हा सिनेमा सर्वप्रथम अक्षयला ऑफर झाला होता. मात्र  एक फोन कॉल आला आणि हा सिनेमा अक्षयने गमावला.  होय, अक्षयला ऐनवेळी या सिनेमात रिप्लेस करण्यात आले होते.

अक्षयने स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.  त्याने सांगितले होते की, ‘फुल और कांटे हा सिनेमा मला मिळाला होता. या सिनेमाच्या सॉन्ग मेकिंग, फोटोशूटला मी हजर होतो. एकदिवस मी नदीम-श्रवणसोबत माझे म्युझिक सेशन सुरू होते. मी फूल और कांटेच्या शूटींगची तयारी सुरु केली होती. याचदरम्यान एक कॉल आला आणि उद्या सकाळी शूटींगला येऊ नकोस, असे मला सांगण्यात आले. ’
अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवून अजय देवगणला या सिनेमात घेण्यात आले. हा सिनेमा अक्षयला मिळाला असता तर तो त्याचा डेब्यू सिनेमा ठरला असता. यानंतर अक्षयने ‘सौगंध’मधून डेब्यू केला. पण तो दणकून आपटला.


1993 साली रिलीज झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमासाठीही अक्षयने ऑडिशन दिले होते. मात्र ऑडिशनमध्ये त्याला रिजेक्ट केले गेले व ही भूमिका दीपक तिजोरीला दिली गेली.  1994 साली मात्र अक्षयच्या नशीबाने अचानक कलाटणी घेतली. त्याला धडाधड नवे सिनेमे ऑफर होऊ लागलेत. या एका वर्षांत त्याचे एक-दोन नाही तर तब्बल 12 सिनेमे रिलीज झाले होते. 1991 ते 2000 पर्यंत अक्षयने 42 सिनेमे केले होते. यातील 12 सिनेमे हिट झाले होते.

Web Title: because of ajay devgn akshay kumar lost blockbuster film phool aur kaante

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.