रिलीजच्या आधीच रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ला मोठा झटका! सिनेमातून डिलिट करावे लागणार इंटिमेट सीन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:49 AM2023-11-29T11:49:09+5:302023-11-29T11:49:42+5:30
Animal Movie : अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'अॅनिमल' १ डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे आता 'अॅनिमल'ला रिलीजपूर्वी काही बदल करावे लागणार आहेत.
अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'अॅनिमल' (Animal Movie) १ डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे आता 'अॅनिमल'ला रिलीजपूर्वी काही बदल करावे लागणार आहेत. खरेतर, 'अॅनिमल'ला दिलेले CBFC प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बोर्डाने 'अॅनिमल'मध्ये ५ बदल सुचवले आहेत.
व्हायरल सर्टिफिकेटनुसार, 'अॅनिमल'च्या निर्मात्यांना विजय आणि झोयाचे इंटिमेट आणि क्लोज-अप शॉट्स काढण्याची सूचना देण्यात आली आहे. रणबीर कपूरने विजयची भूमिका साकारली आहे आणि रश्मिका मंदानाने झोयाची भूमिका साकारली आहे. इंटिमेट सीननंतर सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटातील 'वस्त्र' शब्दाच्या जागी 'कॉश्च्युम' टाकण्याची सूचना केली आहे.
इतर अनेक शब्द बदलावे लागतील
CBFC ने निर्मात्यांना चित्रपटातील आणखी काही ओळी आणि सबटायटल्स बदलण्याची सूचना केली आहे. याशिवाय शपथवाले शब्द काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे. 'अॅनिमल'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत आधीच स्पष्ट केले होते की, हा चित्रपट प्रौढांसाठी आहे आणि त्यामुळेच ते आपल्या मुलाला 'अॅनिमल' पाहण्यासाठी घेऊन जाणार नाहीत.
वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित कथा
'अॅनिमल' चित्रपट वडील आणि मुलाच्या कटू नात्यावर आधारीत आहे. या चित्रपटात अनिल कपूरने रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका केली आहे तर रश्मिका मंदाना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. याशिवाय या चित्रपटात बॉबी देओलचीही महत्त्वाची भूमिका आहे. हिंदीसोबतच तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये डब केलेला हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.