​‘बेगम जान’ विद्या बालनला हुक्का पितांना तुम्ही कधी पाहिलेयं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 12:20 PM2017-01-05T12:20:08+5:302017-01-05T12:20:08+5:30

नव्या वर्षांत अभिनेत्री विद्या बालन आपल्या चाहत्यांसाठी ‘बेगम जान’ बनणार आहे. होय, येत्या मार्च महिन्यात ‘बेगम जान’ हा चित्रपट ...

'Begum Jan' Have you ever seen Hukkas father Vidya Balan? | ​‘बेगम जान’ विद्या बालनला हुक्का पितांना तुम्ही कधी पाहिलेयं का?

​‘बेगम जान’ विद्या बालनला हुक्का पितांना तुम्ही कधी पाहिलेयं का?

googlenewsNext
्या वर्षांत अभिनेत्री विद्या बालन आपल्या चाहत्यांसाठी ‘बेगम जान’ बनणार आहे. होय, येत्या मार्च महिन्यात ‘बेगम जान’ हा चित्रपट रिलीज होतोय. त्याचा फर्स्ट लूक पाहण्यास आपण उत्सूक असालच. तर आम्ही तुमच्यासाठी या चित्रपटाचा फर्स्ट लूक घेऊन आलो आहोत. 
चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून त्यात विद्या अगदी वेगळ्या अवतारात दिसत आहे. खाटेवर पहुडलेली विद्या हुक्का पित असलेली यात दिसते आहे. तिच्या बाजुला अभिनेत्री गौहर खान बसलेली दिसत आहेत.चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता, एकदा पुन्हा आपणा सर्वांना विद्याचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळेल, असे वाटतेय.



‘बेगम जान’ हा चित्रपट सन २०१५ मध्ये आलेला बंगाली चित्रपट ‘राजकाहिनी’च्या कथेवर आधारित आहे. स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या फाळणीकाळातील ही कथा आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान देहविक्रय व्यवसायात फसलेल्या महिलांच्या आयुष्यातील उलथा-पालथ या चित्रपटातून पडद्यावर दिसणार आहे.सर्वात विशेष म्हणजे, यात एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ अभिनेत्री दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. चित्रपटाचे बंगाली व्हर्जन सुद्धा मुखर्जी यांनीच दिग्दर्शित केले होते.
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटास ‘ए’ प्रमाणपत्रासह पास केले असल्याची खबर आहे. असे यासाठी कारण चित्रपटाची कथा एका कुंठणखान्याच्या अवती-भवती फिरणारी आहे. यातील काही शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हे शब्द चित्रपटातून गाळावे लागणार आहेत.
या चित्रपटात विद्या बालन व गौहर खान यांच्यासी नसीरूद्दीन शाह व पल्लवी शारदाही मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: 'Begum Jan' Have you ever seen Hukkas father Vidya Balan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.