'BeingSmart' : सलमान खान लॉन्च करणार स्मार्टफोन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2017 07:07 AM2017-03-09T07:07:28+5:302017-03-09T12:43:03+5:30
सलमान खानचा सिनेमा म्हणजे बॉक्सआॅफिसवर शंभर कोटींचा गल्ला पक्का. पण आता चित्रपटांसोबतच आपल्या लोकप्रीयतेच्या जोरावर वेगवेगळ्या बिझनेसमधून पैसा कमावण्याचा ...
स मान खानचा सिनेमा म्हणजे बॉक्सआॅफिसवर शंभर कोटींचा गल्ला पक्का. पण आता चित्रपटांसोबतच आपल्या लोकप्रीयतेच्या जोरावर वेगवेगळ्या बिझनेसमधून पैसा कमावण्याचा सलमानचा प्लान आहे. यासाठी बिझनेस वाढवण्यावर त्याचा भर आहे. विश्वास बसत नसेल तर ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी. होय, सलमानने आपला बिझनेस वाढवत, गॅझेटच्या बिझनेसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच सलमान मोबाईल मार्केटमध्ये असेल. मीडियाचे मानाल तर, येत्या काळात सलमानच्या ‘बीर्इंग स्मार्ट’ या ब्रांडचे स्मार्टफोन तुमच्या आमच्या हातात दिसू शकतात. ‘बीर्इंग ह्युमन’चे फॅशन एक्सेसरिज आणि कपडे प्रचंड लोकप्रीय आहेत. आता ‘बीर्इंग ह्युमन’ ब्रांडचा मालक असलेल्या सलमानने मिडल मार्केट सेगमेंटमध्ये आपल्या स्मार्टफोनसाठी ‘बीर्इंग स्मार्ट’ ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. एवढेच नाही तर काही स्मार्टफोनचे मॉडल्सही सिलेक्ट केले आहेत. हे मॉडल्स अॅन्ड्रॉईडवर चालणारे असतील. त्यांची किंमत २० हजारांच्या घरात असेल.
प्रारंभी हे स्मार्टफोन आॅनलाईन सेलद्वारे मिळतील. यानंतर रिटेल चेनसोबत भागीदारी केली जाईल. ‘बीर्इंग स्मार्ट’ फोन चीनी कंपन्यांना तगडी टक्कर देतील, अशीही खबर आहे. ‘बीर्इंग ह्युमन’च्या धर्तीवर स्मार्टफोन सेलमधून मिळणारी रक्कमही चॅरिटी व सामाजिक कार्यांसाठी वापरली जाणार आहे.
सध्या सलमान यासाठी आॅपरेशन मॅनेजमेंट टीम तयार करण्यात व्यस्त आहे. या टीममधील अनेकांनी याआधी सॅमसंग व मायक्रोमॅक्ससोबत काम केलेय. चीनी स्मार्टफोन ओपो, विवो आणि शाओमीने देशी हँडसेट कंपन्यांना मागे टाकले आहे. या चीनी कंपन्यांनी मायक्रोमॅक्स व इंटेक्स सारख्या देशी कंपन्यांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. अशास्थितीत सलमानने ‘बीर्इंग स्मार्ट’ला आणण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानचे हे ‘बीर्इंग स्मार्ट’ फोन लोकांना किती आवडतात, ते लवकरच बघू!