पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून पायल रोहतगी ढसाढसा रडली; भडकून PM मोदींना म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:26 PM2021-05-05T14:26:37+5:302021-05-05T14:28:32+5:30

Bengal violence : अभिनेत्री पायल रोहतगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पायल संतापाच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसली आहे.

bengal violence payal rohatgi trash on pm narendra modi | पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून पायल रोहतगी ढसाढसा रडली; भडकून PM मोदींना म्हणाली....

पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून पायल रोहतगी ढसाढसा रडली; भडकून PM मोदींना म्हणाली....

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. काहींनी तिचे समर्थन केले आहे तर अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर भडकलेल्या हिंसाचारावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. कालच या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने कंगना राणौतने रडत रडत देशात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली होती. आता अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) हिचा या हिंसाचारानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पायल संतापाच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसली आहे. मोदीजी आपको शर्म नहीं आती? असा सवाल रडत रडत तिने केला आहे. (Bengal Violence Payal Rohatgi trash on pm Narendra Modi )

व्हिडीओत पायल रोहतगी ढसाढसा रडतेय. मोदीजी, तुम्हाला पाठींबा देणा-यांसोबत हे असे होणार? मोदीजी हे ठीक नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचा नाही का? तुम्हाला त्या लोकांनीही (पश्चिम बंगालच्या लोकांनी) सपोर्ट केला होता ना? आम्हा दोन तीन लोकांच्या मतांनी तर तुम्ही सत्तेत आला नाहीत ना? तुम्हाला असंख्य लोकांनी मते दिलीत. लोकशाही मार्गाने तुम्ही सत्तेत आलात. असे आताना आम्हालाच  लक्ष्य का केले जातेय? आम्ही तुमचे समर्थक आहोत म्हणून? तुम्हाला जे करायचे ते करा, जसे करायचे तसे करा. पण लोकांची हत्या होता कामा नये, असे पायल रोहतगी या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. काहींनी तिचे समर्थन केले आहे तर अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. पायल आता दुसरी कंगना बनण्याचा प्रशत्न करतेय, असे एका युजरने तिची खिल्ली उडवताना लिहिले आहे. पायलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बिचारे मोदी रात्री जेवले नसतील, अशा शब्दांत अन्य एकाने या व्हिडीओची खिल्ली उडवली आहे.

Web Title: bengal violence payal rohatgi trash on pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.