आता काही उरले नाही म्हणत या अभिनेत्याने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, चाहत्यांनी वाचवला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:07 IST2021-06-10T18:06:38+5:302021-06-10T18:07:45+5:30
या अभिनेत्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांना आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितले होते.

आता काही उरले नाही म्हणत या अभिनेत्याने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, चाहत्यांनी वाचवला जीव
कोरोनाने थैमान घातल्यानंतर गेल्यावर्षी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या सगळ्यामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. चित्रपटसृष्टीशी निगडित असलेले अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. रोजगार मिळत नसल्याने एका अभिनेत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या चाहत्यांनी त्याचा जीव वाचवला आहे.
बंगाली अभिनेता सुवो चक्रवर्तीने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांना आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितले होते. 'मंगल चंडी' आणि 'मनासा यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले होते. पण लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्याला काम मिळणं बंद झाले होते. तसेच त्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने तो नैराश्यात गेला होता.
झोपेची गोळी खाऊन जीवन संपवायची वेळ आली आहे असे म्हणत त्याने लाईव्ह सेशन बंद केले होते. हे पाहून त्याचे चाहते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी ताबडतोब सुवोच्या घराकडे धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सुवोचा जीव वाचू शकला.