SHOCKING!  प्रसिद्ध अभिनेत्री निघाली पाकिटमार, पर्समधून जप्त केली इतकी चोरीची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 04:34 PM2022-03-13T16:34:54+5:302022-03-13T16:38:44+5:30

Rupa Dutta Arrested: कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात पाकिट मारल्याच्या आरोपाखाली कोलकाता येथे तिला अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी चित्रपट निर्माते अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

bengali actress rupa dutta arrested on the charges of pickpocketing | SHOCKING!  प्रसिद्ध अभिनेत्री निघाली पाकिटमार, पर्समधून जप्त केली इतकी चोरीची रक्कम

SHOCKING!  प्रसिद्ध अभिनेत्री निघाली पाकिटमार, पर्समधून जप्त केली इतकी चोरीची रक्कम

googlenewsNext

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रूपा दत्ता  (Rupa Dutta Arrested) हिला अटक झाल्याने बंगाली फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. कोलकात्यातील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात पाकिटमाारी केल्याच्या आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक झाल्याचे कळतेय.  तिच्या बॅगेतून 65 हजार 760 रुपये सापडले, मात्र चौकशीदरम्यान हे पैसे कुठून आले, याबाबत ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. चौकशी केली असता, तिने कबूल केले की ती गर्दीत पाकिट मारत होती. 

अशी अडकली  पोलिसांच्या  जाळ्यात
कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यामध्ये काही पोलिस तैनात होते. एका पोलिसाला एक महिला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकत असल्याचं दिसली. त्याला तिचा संशय आला. पोलिसांनी लगेच तिची चौकशी सुरू केली. सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी तिच्या बॅगेची झडती घेतली असता तिच्या बॅगेत 65 हजार 760 रूपये सापडले. नंतर तिला पोलिस ठाण्यात आणलं असता, ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रूपा दत्ता असल्याचं समोर आले. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.


   
अनुराग कश्यपवर केले होते गंभीर आरोप

रूपा दत्ता ही बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठ्ठ नाव आहे. याआधी हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. 2020 मध्ये तिने  एक ट्वीट करत अनुरागवर अनेक आरोप केले होते. अनुरागच्या नजरेत महिलांबद्दल जराही आदर नाही. त्याला ओळखू लागल्यावर मला हे कळलं. त्यामुळे पायल घोषने त्याच्यावर केलेले आरोप खरे आहे. अनुराग कश्यपला कठोर शिक्षा मिळायला हवी. तो ड्रग्जही घेतो असा खळबळजनक आरोप रूपा दत्ताने या ट्वीटमध्ये केला होता.

Web Title: bengali actress rupa dutta arrested on the charges of pickpocketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.