Besharam Rang Controversy: कपड्याच्या रंगापेक्षा आपल्या देशात..,  ‘बेशरम रंग’च्या गायिकेची भगव्या बिकिनीवर ‘बेधडक’ प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:36 AM2022-12-16T10:36:34+5:302022-12-16T11:17:04+5:30

Besharam Rang Controversy: शाहरूख खानच्या ‘पठान’चं ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि अन्य हिंदू संघटना आक्रमक झाल्यात आहेत...

Besharam Rang singer Caralisa Monteiro reacted to the controversy around Pathaan's song Besharam Rang | Besharam Rang Controversy: कपड्याच्या रंगापेक्षा आपल्या देशात..,  ‘बेशरम रंग’च्या गायिकेची भगव्या बिकिनीवर ‘बेधडक’ प्रतिक्रिया

Besharam Rang Controversy: कपड्याच्या रंगापेक्षा आपल्या देशात..,  ‘बेशरम रंग’च्या गायिकेची भगव्या बिकिनीवर ‘बेधडक’ प्रतिक्रिया

googlenewsNext

Besharam Rang Controversy:  शाहरूख खानच्या ‘पठान’चं  (Pathaan) ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं नवा वाद ओढवून घेतला. या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि अन्य हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. मध्यप्रदेशात अनेक ठिकाणी याविरोधात या संघटना रस्त्यावरही उतरल्या. ‘पठान’ हा सिनेमा आणि ‘बेशरम रंग’ हे गाणं दोन्ही विषारी मानसिकेतून बनवण्यात आलं आहे असा आरोप या संघटना करत आहेत. मध्यप्रदेशचे गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या वादात उडी घेत ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे कपडे यात निर्मात्यांनी बदल करावा, अन्यथा  मध्यप्रदेशात चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही, अशा इशारा दिला आहे. आता या वादावर सिंगर कॅरालिसा मोंटेरो (Caralisa Monteiro) हिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्यात काही स्पॅनिश बोल आहेत. ते कॅरालिसाने गायले आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात  दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीचा वाद निरर्थक असल्याचं तिने म्हटलं आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘राष्ट्रध्वजातील भगवा रंग ही एकच गोष्ट शाळा शिकत असल्यापासून मला आठवते. हा रंग धैर्य आणि निस्वार्थीपणाचं प्रतिक आहे. मला माहित नाही कोणत्या खासदाराने ( मध्यप्रदेशचे गृहमंत्री ) यावर आक्षेप घेतला आहे. पण, आपल्या देशात एका काल्पनिक चित्रपटात वापरण्यात आलेल्या कपड्यांच्या रंगापेक्षा अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक गंभीर समस्या आहे. माझ्यामते, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’  
 ‘बेशरम रंग’ या गाण्यात रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. पहिल्या तासाभरात या गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. 

शाहरूख म्हणाला...

‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरूख खान यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘सोशल मिडीया हे माध्यम बऱ्याचदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालवले जाते. मी कुठेतरी वाचलं आहे की नकारात्मकता सोशल मीडियाचा वापर वाढवते. अशा प्रयत्नांमुळे समाजात फूट पडते आणि यातून विध्वंसच घडतो.  अर्थात जगाता काहीही सुरू असो फरक पडत नाही, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील, ’ असं शाहरूख म्हणाला. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो बोलत होता.

Web Title: Besharam Rang singer Caralisa Monteiro reacted to the controversy around Pathaan's song Besharam Rang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.